युवकावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:07 IST2021-06-17T04:07:55+5:302021-06-17T04:07:55+5:30
बिबट्याशी झुंज देत त्यांनी आरडाओरडा केला. लोकांची चाहूल लागताच बिबट्याने उसात पलायन केले होते. नीलेश घुले यांच्या हातावर, मानेवर ...

युवकावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद
बिबट्याशी झुंज देत त्यांनी आरडाओरडा केला. लोकांची चाहूल लागताच बिबट्याने उसात पलायन केले होते. नीलेश घुले यांच्या हातावर, मानेवर ३० ठिकाणी बिबट्याने नख्या व दाताने ओरखडे होते .
बिबट्याच्या हल्ल्याने घुले पटातील नागरिक भयग्रस्त झाले होते. त्यांनी येथे बिबट्याला पकडण्यासाठी ताबडतोब पिंजरा लावावा, अशी मागणी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ओतूर वनविभागाने जुन्नचे सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून रोजी सायंकाळी तेथे पिंजरा लावण्यात आला. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून एक शेळी ठेवली होती, गस्त व देखरकी साठी वनपाल व वनमजूर यांनी नेमणूक केली होती.
बुधवार, दि. १६ रोजी पहाटे बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ पिंजऱ्यात शिरला व जेरबंद
झाला. हा बिबट्या नर जातीचा असून सुमारे ९ वर्षांचा आहे. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला, त्या वेळी वनविभागाचे सहायक वनरक्षक अमित भिसे, ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हसेकर वनपाल सुधाकर गिते, अतुल वाघेले उदापूरचे वनरक्षक सुदाम राठोड ,वनमजूर फुलचंद खंडागळे ,गंगाराम जाधव उपस्थित होते.
.ही कारवाई जुन्नरचे सहायक वनरक्षक अमित भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले या बिबट्याला तातडीने माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे, असे वनपाल सुधाकर गिते यांनी सांगितले.
-पिंजऱ्यात जेरबंद बिबट्या वनविभागाचे कर्मचारी अधिकारी .