शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दौंड तालुक्यातही आला बिबट्या; ठसे आढळले, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 00:46 IST

जुन्नर आणि आंबेगावमध्ये बिबट्यांचे सर्रास दर्शन होत असताना आता बिबट्यांनी थेट दौंड तालुक्यातही आपला वावर वाढविल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाटस : जुन्नर आणि आंबेगावमध्ये बिबट्यांचे सर्रास दर्शन होत असताना आता बिबट्यांनी थेट दौंड तालुक्यातही आपला वावर वाढविल्याचे स्पष्ट झाले आहे. कानगाव (ता. दौंड) येथील शेतकरी राजेंद्र गवळी हे शेतकाम उरकून जे.सी.बी मशीन घेऊन घरी येत असताना रात्री ८ च्या सुमारास त्यांना अचानक बिबट्या रस्त्यावर आल्याचे दिसून आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे कानगाव व पंचक्रोशीत आता बिबट्याची दहशत पसरली आहे.यापूर्वीही बिबट्याचे दर्शन या भागात झाले होते. इतकेच नव्हे तर चार वेळा बिबट्याने येथील पाळीव जनावरांची शिकारही केली होती.मात्र ती क्वचीतच झालेली होती. पण हल्ली आंबेगाव आणि शिरुरमद्ये बिबट्यांची संख्या आणि त्यांचे हल्लेही वाढल्याच्या बातम्या वारंवार येत असताना कानगावमद्येही बिबट्या नजरेस आल्याने येथेही बिबट्यांची संख्या वाढल्याची भिती व्यक्त केली जात आहे. याबाबत पुणे जिल्हा राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष माऊली शेळके यांनी तात्काळ वनविभाच्या अधिकाºयांना कानगावमध्ये बिबट्या असल्याचे दुरध्वनीद्वारे कळवले. दरम्यान परिस्थितीची पाहणीसाठी करण्यसाठी वनविभाग अधिकारी देखील उपस्थित झाले.मात्र बिबट्यांच्या पायांच्या ठशांवरून तो गेलेली दिशा कळाली मात्र त्याचा नेमका ठाव ठिकाणा सापडला नाही. यावेळी माऊली शेळके, भीमा पाटसचे संचालक राजेंद्र गवळी, धनंजय कोºहाळे, शिवाजी निगडे, वनविभाग मंडल अधिकारी सय्यद आणि कर्मचारी उपस्थित होत.राजेंद्र गवळी यांना रात्री रस्त्यावरच बिबट्याचे दर्शन घडले. त्यांनी जेसीबी मशीन थांबवून जेसीबीच्या लाईटमध्ये मोबाईलमध्येच चित्रीकरण केले आहे. त्याचा व्हिडीओ गावात व्हायरल होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी सोडण्यासाठीशेतकरी घराबाहेर पडण्याचे धाडस करत नाहीत. वीजपुरवठा दिवसा खंडितहोत असल्याने दिवसाही शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे बिबट्याच्या भीतीचा थेट परिणाम शेतीच्यापाण्यावर होतो आहे.पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये गावा-गावामध्ये बिबट्याचा वावर सर्रास झाला आहे. परिणामी शेतकºयांचे नुकसान होऊन भीती निर्माण झाली आहे. परंतु दुर्दैवाने सरकार यावर गंभीर नाही. त्यामुळे आता तरी सरकारने वेळेत याची दक्षता घेऊन तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.- मा. माऊली शेळकेअध्यक्ष, राष्ट्रवादी किसानसेल, पुणे जिल्हा

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे