शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लेकानं जिंकलं... शेतकऱ्याचं पोरगं फौजदार झालं अन् बापाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 05:36 IST

पुण्यातील नीलेश बर्वे राज्यात पहिला

पुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून ग्रामीण भागातील मुले मोठे साहेब होतात. गावातून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. मग आपल्याही मुलाने एमपीएससीची तयारी करून साहेब व्हावे, अशी इच्छा आई-वडील व्यक्त करतात. तीच इच्छा पूर्ण करत नीलेश बर्वे याने फौजदार परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने शेतकरी पित्याच्या डोळ्यांतून घळाघळा आनंदाश्रू वाहिले. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यात पुण्यातील चास (ता. आंबेगाव) येथील नीलेश बर्वे हा राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. या यशाचा आनंद कुटुंबियांनी व मित्रांनी जल्लोषात साजरा केला.लहानपणापासून हुशार असलेल्या नीलेशने गुणवत्तेच्या जोरावर अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवला. २०१३मध्ये पदवी घेतल्यानंतर  पुण्यात येऊन खासगी अभ्यासिकेत समन्वयक म्हणून काम केले.नीलेशने दररोज बारा तास अभ्यास केला. मित्रांबरोबर दुपारी दोन ते पाच यावेळेत चर्चा करून अभ्यास केला. राज्यसेवा परीक्षेसह पीएसआय परीक्षेची तयारी केली. तीनवेळा मुख्य परीक्षा देऊनही यश मिळाले नाही. २०१९च्या परीक्षेत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि यश संपादन केले.

प्रयत्न थांबणार नाहीत पीएसआय झालो म्हणून थांबणार नाही, तर आता उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, गटविकास अधिकारी आदी पदांवर नियुक्तीसाठी अभ्यास करत आहे. मोठा साहेब होण्याचे आई-वडील आणि आजोबांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करेन. - नीलेश बर्वे

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षा