शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

रस्ता सुरक्षा समिती बैठकीकडे आमदारांची पाठ, जानेवारीतील बैठकीसही एकच आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:55 IST

जिल्ह्यातील एकूण २१ आमदारांपैकी एकाही आमदारांनी हजेरी लावली नाही.

पुणे : शहर व जिल्ह्यातील रस्ते वाहतुकीसंदर्भातील समस्या, त्यावरील उपाययोजना यांसह रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे आमदारांनी पाठ फिरविली आहे. बुधवारी झालेल्या या वर्षातील दुसऱ्या बैठकीला जिल्ह्यातील एकूण २१ आमदारांपैकी एकाही आमदारांनी हजेरी लावली नाही. जानेवारी महिन्यात झालेल्या पहिल्या बैठकीलाही केवळ एकच आमदार उपस्थित होते. काही खासदार व महापौरही या बैठकीकडे फिरकले नाहीत.केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाने जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या रचनेत बदल केला आहे. पुर्वी प्रत्येक जिल्ह्यातील समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असायचे, तर अन्य सदस्यही परिवहन, पोलिस, महसूल विभागातील प्रतिनिधीच होते. ही समिती बरखास्त करून शासनाने जिल्ह्यातील ज्येष्ठ खासदारांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे जिल्ह्याची समिती ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली. रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, जिल्ह्यातील लोकसभा व राज्यसभेचे सदस्य, सर्व आमदार, महापौर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी हे समिती सदस्य आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी समितीचे सदस्य सचिव आहेत.समितीची पहिली बैठक दि. २० जानेवारी घेण्यात आली. या बैठकीला खासदार आढळराव पाटील, अनिल शिरोळे व अमर साबळे उपस्थित होते. आमदारांमध्ये २१ पैकी केवळ भीमराव तापकीर यांनी हजेरी लावली होती. इतर आमदारांनी मात्र त्याकडे पाठ फिरविली. दुसरी बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीलाही लोकप्रतिनिधींपैकी तिन खासदार वगळता कुणीही उपस्थित राहिले नाही. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील एकूण २१ आमदार आहेत. मात्र, त्यापैकी एकाही आमदारांची उपस्थिती दिसून आली नाही. पूर्वी जिल्हाधिकारी अध्यक्ष व इतर अधिकारी सदस्य असल्याने मर्यादा होत्या. आता सर्व लोकप्रतिनिधी सदस्य असल्याने रस्ता सुरक्षा समितीचा आवाका वाढला आहे. त्यांच्याकडील कार्यकर्ते, यंत्रणा यांमुळे कानाकोपºयातील रस्तेविषयक प्रश्न मांडले जाऊ शकतात.संबंधित लोकप्रतिनिधी आपल्या भागातील रस्त्याच्या समस्या, उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा करू शकतात. त्यातून मार्ग काढला जाऊ शकतो. संबंधित कामांची अंमलबजावणीही वेगाने होऊ शकते. त्यामुळे आमदारांनाही आपल्या भागात काम करण्यासाठी खूप संधी आहे.रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीबाबत सर्वांना शासनासह माझ्याकडूनही महत्त्वाचे विषय असल्याने हजर राहण्याबाबत वैयक्तिक पत्रे गेली होती. पण बैठकीला एकही आमदार नसल्याने ही बाब खटकली. ही महत्त्वाची समिती आहे. त्यामुळे पुढील बैठकीला स्वत: प्रत्येकाला दूरध्वनी करून सांगणार आहे.- खासदार शिवाजीरावआढळराव पाटील, अध्यक्ष, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती

टॅग्स :Travelप्रवासPuneपुणे