विधानसभेचा पराभव केवळ अपघात : पाटील
By Admin | Updated: October 28, 2014 23:57 IST2014-10-28T23:57:49+5:302014-10-28T23:57:49+5:30
विधानसभा निवडणुकीतील पराभव म्हणजे केवळ एक अपघात आहे.

विधानसभेचा पराभव केवळ अपघात : पाटील
इंदापूर : विधानसभा निवडणुकीतील पराभव म्हणजे केवळ एक अपघात आहे. त्यामुळे खचणार नाही. अधिक जोमाने येत्या पाच वर्षात आपण काम करणार आहोत. पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत परत तालुक्यात काँग्रेसची सत्ता प्रस्थापित केल्याखेरीज स्वस्थ बसणार
नाही, असा आशावाद माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
मंगळवार (दि.28) कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी मी घेत आहे.मात्र खचुन न जाता
पुढची वाटचाल सन 1995
च्या निवडणुकीप्रमाणो संघटना
मजबुत करून करावीच लागणार आहे.त्याची सुरूवात गावापासून ते जिल्हा परिषदेपर्यंत करण्यात येईल.नगरपालिकेच्या हद्दीत विशेष बैठका घेण्यात येतील. सर्वसामान्यांशी माझा थेट संपर्क राहिल.गावात कार्यकत्र्याचे देान
गट असणार नाहीत.ज्यांना
इकडे तिकडे करायचे आहे.
त्यांनी दुसरा मार्ग स्विकारावा,
असा स्पष्ट इशारा पाटील यांनी
दिला.
मतदान देणा:यांच्या पाठीशी
राहू. कार्यकत्यांनी संघटन पातळीपासूनच परिवर्तन करावे.ू सर्वसामान्यांची कामे यशस्वीपणो करणार असे यावेळी पाटील
यांनी सांगितले.
या मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी आपल्या भाषणात पक्ष संघटन वाढविण्याची तसेच निवडणुकीत वेगळे वागणा:यांना बाजुला काढा, अशी भावना व्यक्त केली. (वार्ताहर)
या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिल्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कंठ दाटून आला. मात्र त्यांनी स्वत:ला सावरले. त्यानंतर त्यांनी स्व. शंकरराव पाटील यांनी आपल्यावर जबाबदारी टाकली. ती या निवडणुकीत पार पाडू शकलो नाही. मोठय़ा भाऊंचा चेहरा डोळ्यासमोर आला. स्वाभिमानी माणसाचे हे अश्रू आहेत, असे सांगत कार्यकत्र्याना मार्गदर्शन केले.