शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pune | बंदोबस्तावरील पोलिसांनी एकटे सोडले अन् त्याने ठोकली धूम; मनोरुग्ण आरोपी ससूनमधून पळाला

By विवेक भुसे | Updated: April 24, 2023 15:23 IST

याबाबत पोलीस शिपाई प्रकाश मांडगे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे...

पुणे : आर्म अॅक्टखाली अटक केलेल्या आरोपीवर ससून रुग्णालयात मानसिक उपचार करण्यात येत होते. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला एकटे सोडल्याचे पाहून त्याने हातातील बेडी काढून धुम ठोकली.

बाळु ऊर्फ चक्रधर रानबा गोडसे (वय ३०, रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे या आरोपीचे नाव आहे. ही घटना ससून रुग्णालयातील वॉर्ड नं. २६ मध्ये शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली.याबाबत पोलीस शिपाई प्रकाश मांडगे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळु गोडसे याला श्रीगोंदा पोलिसांनी शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचारासाठी १९ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. वॉर्ड नं. २६ येथे त्याच्यावर मानसिक उपचार करण्यात येत होते. त्यासाठी बंदोबस्तासाठी पोलिसांची नेमणूक केली होती. फिर्यादी व पोलीस शिपाई संजय कोतकर हे कर्तव्यावर होते. आरोपीला कधी डिस्चार्ज देण्यात येणार हे विचारण्यासाठी फिर्यादी गेले होते. त्याचवेळी कोतकर हे वॉशरुमला गेले. हे पाहून गोडसेने बेडीमधून त्याचा हात काढून गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी