जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना एलईडी संच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:09 IST2021-04-10T04:09:53+5:302021-04-10T04:09:53+5:30
राजमुद्रा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक राजेंद्र लष्करे व शिक्षक वर्गाकडे सुपूर्द करण्यात आला. ...

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना एलईडी संच
राजमुद्रा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांच्या हस्ते मुख्याध्यापक राजेंद्र लष्करे व शिक्षक वर्गाकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी उद्योजक संजय शेळके रांजणगाव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र लष्करे ,बाभूळसर खुर्दचे मुख्याध्यापक बाळासाहेब डांगे,शिक्षक सुरेश थोरात, पंडित वेताळ, प्रकाश नरवडे, डहाळे ,सुभाष चव्हाण, मिलिंद आबनावे उपस्थित होते.
या एलईडी संचामुळे इंटरनेटचा वापर करून इयत्ता निहाय व विषयानुसार अभ्यासक्रमाचे शैक्षणिक साहित्य डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना दाखविता येणार आहे. शिवाय एलईडी संचाला मोबाईल जोडून तज्ज्ञ शिक्षकांनी तयार केलेले अभ्यासक्रमनिहाय शैक्षणिक साहित्यही विद्यार्थ्यांना दाखविल्यास विद्यार्थ्यांना ते सहजपणे समजेल त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचे केंद्रप्रमुख सुनील जोशी यांनी सांगितले.
०९ रांजणगाव गणपती
स्वाती पांचुदकर यांच्या माध्यमातून रांजणगाव गणपती शाळेला एलईडी संच देण्यात आला.