आंबेगाव तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:12+5:302021-02-05T05:08:12+5:30

या वेळी नायब तहसीलदार अनंथा गवारी, जयश्री भवारी, पंचायत समिती माजी सभापती उषाताई कानडे, उपसभापती संतोष भोर, सुनील ...

Leaving reservation of 103 gram panchayats in Ambegaon taluka announced | आंबेगाव तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत जाहीर

आंबेगाव तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत जाहीर

या वेळी नायब तहसीलदार अनंथा गवारी, जयश्री भवारी, पंचायत समिती माजी सभापती उषाताई कानडे, उपसभापती संतोष भोर, सुनील बाणखेले, संतोष डोके, सचिन बांगर, विजय पवार आदी पदाधिकारी व विविध गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी अर्णव शरद काळे या मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

आंबेगाव तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या मंचर ग्रामपंचायत अनुसूचित जाती महिला व घोडेगाव ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिला आरक्षण आले.

या आरक्षण सोडतीमध्ये

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) सर्वसाधारण: पहाडदरा, लांडेवाडी/पिंगळवाडी, तळेकरवाडी, लाखणगाव, गावडेवाडी, अवसरी खुर्द, पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे, वडगाव काशिंबेग, भराडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला: नांदुर, लौकी, भावडी, धोंडमाळ/शिंदेवाडी, मांदळेवाडी, टाव्हरेवाडी, जवळे, चास, कळंब.

अनुसुचीत जाती (एससी) सर्वसाधारण: वळती

अनुसुचीत जाती (एससी) महीला: काळेवाडी-दरेकरवाडी, मंचर.

खुल्या प्रवर्गासाठी सर्वसाधारण: कोलदरा/गोनवडी, कुरवंडी, निघोटवाडी, निरगुडसर, नागापूर, भागडी, खडकी, काठापूर बु., पेठ, कोळवाडी/कोटमदरा, देवगांव, मेंगडेवाडी, शेवाळवाडी, वडगांव पीर, थोरांदळे, लोणी, साकोरे, विठ्ठलवाडी, रानमळा.

सर्वसाधारण महिला: ठाकरवाडी, टाकेवाडी, वाळुंजनगर, चिंचोडी, आंबेगाव गावठाण, महाळुंगे पडवळ, अवसरी बुद्रूक, पारगावतर्फे खेड, नारोडी, रांजणी, पारगावतर्फे अवसरी बुद्रूक, कारेगाव, गिरवली, पोंदेवाडी, चिंचोली, धामणी, खडकवाडी, शिरदाळे, तांबडेमळा, जाधववाडी.

अनुसूचित जमाती (एसटी) सर्वसाधारण: चिखली, साल, बोरघर, गोहे बु., फलोदे, पाटण, सुपेधर, महाळुंगे तर्फे घोडा, फुलवडे, डिंभे बुद्रूक, पोखरी, राजपूर, ढाकाळे, आसाणे, तिरपाड, शिनोली, माळीण, उगलेवाडी/फदालेवाडी या १८ आदिवासी क्षेत्रातील तर चांडोली खुर्द, चांडोली बुद्रूक, शिंगवे या सर्वसाधारण तीन बिगर आदिवासी क्षेत्रातील.

अनुसूचित जमाती (एसटी) महिला: पिंपरगणे, कुशिरे बुद्रूक, कोलतावडे, आहुपे, जांभोरी, तळेघर, कानसे, गोहे खुर्द, डिंभे खुर्द, आंबेदरा, आमोंडी, गंगापुर खुर्द, पांचाळे बुद्रूक, चपटेवाडी, राजेवाडी, पिंपळगांव तर्फे घोडा, गंगापुर बुद्रूक, कोंढवळ या १८ आदिवासी क्षेत्रातील तर घोडेगाव, एकलहरे, थुगांव, जारकरवाडी बिगर आदिवासी क्षेत्रातील.

Web Title: Leaving reservation of 103 gram panchayats in Ambegaon taluka announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.