शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाइन सोडून विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षेकडे ओढा, पर्याय निवडीचा रविवारी अंतिम दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 10:46 IST

अंतिम वर्षाची परीक्षा : पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जाणार आहेत.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठतर्फे घेतल्या जाणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी पूर्वी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडणाऱ्या सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी आता ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे.विद्यार्थ्यांना येत्या (दि.२७) रविवारपर्यंत परीक्षेचा पर्याय बदलता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडावा ,असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यापरीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी केले आहे.

पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतले जाणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेचा पर्याय दिला. त्यात अधिकाधिक विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेला पसंती देत आहेत. अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख २८ हजार ४९९ एवढी असून त्यातील १ लाख ८९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. तर ३९ हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेला पसंती दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांसमोर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय ठेवला. त्यास विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.ऑनलाइन परीक्षा पद्धतीतही सर्वाधिक विद्यार्थ्यांनी मोबाईलद्वारे परीक्षा देण्याचा पर्याय निवडला आहे.तर सुमारे 39 हजार विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने 'ओएमआर शीट' द्वारे परीक्षा देणार आहेत. त्यातही अद्याप ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्हीपैकी कोणताही परीक्षेचा पर्याय न निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १९ हजार आहे. या विद्यार्थ्यांनी पर्याय निवडल्यास त्यांना ऑफलाइन पद्धतीने परीक्षा द्यावी लागणार आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परीक्षा केंद्रा पैकी एक परीक्षा केंद्र परीक्षा देण्यासाठी निवडावे, असेही आवाहन विद्यापीठ प्रशसनातर्फे करण्यात आले आहे. विद्यापीठाने ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही परीक्षेचा पर्याय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली  असून बरेच विद्यार्थी पूर्वी निवडलेल्या ऑफलाइन परीक्षेचा पर्याय बदलून ऑनलाइनचा पर्याय स्वीकारत आहेत.गेल्या काही दिवसात सुमारे १ हजार २०० विद्यार्थ्यांनी ऑफलाइन सोडून ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडला. तर केवळ ४ विद्यार्थी ऑनलाइन सोडून ऑफलाइनला गेले आहेत.- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा मूल्यमापन मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :examपरीक्षाPune universityपुणे विद्यापीठPuneपुणेEducationशिक्षण