चासकमानच्या डाव्या कालव्याला गळती

By Admin | Updated: January 23, 2017 02:42 IST2017-01-23T02:42:47+5:302017-01-23T02:42:47+5:30

चासकमान धरणातून डाव्या कालव्याच्या पाण्याच्या गळतीमुळे दावडी परिसरातील ओढे-नाले खळखळून वाहात आहेत. त्यामुळे

The leak to the left canal of the Chasmaan | चासकमानच्या डाव्या कालव्याला गळती

चासकमानच्या डाव्या कालव्याला गळती

दावडी : चासकमान धरणातून डाव्या कालव्याच्या पाण्याच्या गळतीमुळे दावडी परिसरातील ओढे-नाले खळखळून वाहात आहेत. त्यामुळे रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
उन्हाळ्याचे अजून चार महिने बाकी असून ऐन उन्हाळ्यात धरणात पाणी शिल्लक राहील की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. या पाण्याची नासाडी थांबवा...ओ, असे शेतकरी सांगत आहे.
गेल्या आठवड्यात चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला रब्बी हंगामासाठी नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे शिरूर तालुक्यासाठी २७ दिवस व खेड तालुक्यासाठी २३ दिवस असे ५० दिवसांचे पाण्याचे आवर्तन शेतकऱ्यांना गरज नसताना सोडण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: The leak to the left canal of the Chasmaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.