पत्रके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST2020-12-09T04:09:09+5:302020-12-09T04:09:09+5:30
पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ...

पत्रके
पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे आयोजन शहराध्यक्ष प्रफुल्ल गुजर यांनी केले. यावेळी संतोष संकद, निर्मला वंशीव, मूनवर कुरेशी, प्रवीण गायकवाड, जितेंद्र जाधव, महेश कांबळे, गौरव जाधव, अभिजित शेलार, सतीश रणावरे, दीपक ओव्हाळ, मयूर शिंदे, किशोर लष्करे आदी उपस्थित होते.
------------
ऑनलाइन राष्ट्रीय नाट्य स्पर्धा उत्साहात
पुणे : अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या वतीने आणि युनेस्कोच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय कला प्रज्ञा शोध परीक्षा उत्साहात पार पडली.
ही स्पर्धा दि. १ ते ५ दरम्यान ऑनलाइन पार पडली. भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारात भरतनाट्यम , कथ्थक, कुचिपुडी, ओडीसी तसेच पारंपरिक लोकनृत्य, पाश्चात्य नृत्य, गायन, वादन , या कला सादरीकरणात स्पर्धा घेण्यात आली. चित्रा सुब्रम्हणयम, उज्ज्वला नगरकर, स्नेहा पेटकर, अमिरा पाटणकर यांनी परीक्षण केले.
------------------------
जैन संघटनेचे २० डिसेंबरला ऑनलाईन संमेलन
पुणे : भारतीय जैन संघटनेच्या वतीने बीए, बीकॉम, बीएससी, डिप्लोमा आदी कोर्सेस पात्र झालेल्यासाठी ऑनलाईन परिचय संमेलन येत्या २० डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनात जैन धर्माच्या सर्व पंथातील ३५ वर्षांपर्यंतचे उमेदवार सहभागी होऊ शकतात. तसेच १०वी १२ वी पास नापास महिला देखील सहभागी होऊ शकतात. नाव नोंदणी BJS Connect या मोबाईल ऑपवर करायची असल्याची माहिती संमेलन प्रमुख श्रीपाल ललवाणी यांनी दिली.
----------