संकेतस्थळावर झळकताहेत नेते

By Admin | Updated: September 15, 2014 05:11 IST2014-09-15T05:11:20+5:302014-09-15T05:11:20+5:30

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व मंत्र्यांची छायाचित्रे तातडीने काढली

Leading up on the website | संकेतस्थळावर झळकताहेत नेते

संकेतस्थळावर झळकताहेत नेते

देवराम भेगडे, किवळे
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व मंत्र्यांची छायाचित्रे तातडीने काढली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद, पीएमपीतील लोकप्रतिनिधींची छायचित्रे संबंधित संकेतस्थळावर अद्यापही झळकत आहेत. त्यामुळे संबंधित संस्थांकडून आचारसंहितचा भंग होत नाही का, जिल्हा निवडणूक अधिकारी दखल घेतील का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सर्वत्र शुक्रवारी १२ सप्टेंबरला लागू झाली आहे. सर्वांवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची कायदेशीर जबाबदारी आहे, असे असताना पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ‘मान्यवर’ शीर्षकावर क्लिक केले असता पंतप्रधानासह राष्ट्रीय, प्रादेशिक व जिल्ह्यातील नेत्यांची छायाचित्रे झळकत आहेत. तसेच पदाधिकारी शीर्षकाखाली सर्व जिल्हा परिषद सदस्यांची छायाचित्रे आहेत. तसेच छायाचित्र दालन या शीर्षकाखाली विविध कार्यक्रमांतील नेत्यांची यांचे छायाचित्र
झळकत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका संकेतस्थळावर महापौरासह माजी महापौरांची छायाचित्रे पुरस्कार शीर्षकाखाली दिसत आहेत. तसेच सर्व नगरसेवकांची छायाचित्रे दिसत आहेत.

Web Title: Leading up on the website