नेत्यांनी शहरात फिरून घेतला आढावा

By Admin | Updated: February 22, 2017 03:21 IST2017-02-22T03:21:00+5:302017-02-22T03:21:00+5:30

मतदान सुरू असताना उमेदवारांबरोबरच विविध पक्षांच्या नेत्यांनीही ी शहरात फेरफटका मारून मतदान कसे सुरू आहे याची

Leaders reviewed the city | नेत्यांनी शहरात फिरून घेतला आढावा

नेत्यांनी शहरात फिरून घेतला आढावा

पुणे : मतदान सुरू असताना उमेदवारांबरोबरच विविध पक्षांच्या नेत्यांनीही ी शहरात फेरफटका मारून मतदान कसे सुरू आहे याची माहिती घेतली. स्थानिक उमेदवारांची भेट घेत त्यांनी काही मदत हवी आहे याची त्यांच्याकडे विचारणा केली.
पालक मंत्री गिरीष बापट यांनी शहरातील विविध प्रभागांना भेटी दिल्या. उमेदवारांची विचारपूस करून मतदानाबाबत माहिती घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, भाजपचे योगेश गोगावले, काँग्रेसचे रमेश बागवे, शिवसेनेचे विनायक निम्हण, मनसेचे अजय शिंदे यांनी शहराच्या विविध भागात जाऊन आपापल्या उमेदवारांची भेट घेत मतदान केंद्रांची पाहणी केली.
काही ठिकाणी उमेदवारांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या, त्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना त्या तक्रारींचे निराकरण केले.
(प्रतिनिधी)

Web Title: Leaders reviewed the city