शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वकिलावरील गोळीबाराच्या निषेधार्थ आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 09:55 IST

व्यावसायिक कारणावरुन हल्ला झाल्याचा संशय

पुणे : पुणे बार असोशिएशनचे सभासद अ‍ॅड. देवानंद ढोकणे यांच्यावर सोमवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर व जिल्ह्यातील वकील संघटना आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. अ‍ॅड. देवानंद ढोकणे यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काल त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शरीरातील गोळ्या काढण्यात आल्या आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात  रक्तस्त्राव झाल्यानं त्यांची अद्याप प्रकृती गंभीर आहे. व्यावसायिक कारणावरुन अथवा वैयक्तिक वादातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अ‍ॅड. देवानंद रत्नाकर ढोकणे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांचा भाऊ भरत ढोकणे यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. भरत ढोकणेदेखील फौजदारी तसेच कौटुंबिक खटल्यांचे कामकाज पाहतात. अ‍ॅड. ढोकणे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व वकील आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ येथे जमून आज दुपारी १२ वाजता या घटनेचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. अ‍ॅड. देवानंद आणि भरत ढोकणे यांनी काल न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर आपल्या पक्षकारांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यानंतर ते रात्री आठच्या सुमारास स्विफ्ट कारने येरवडा येथील घरी निघाले. भरत ढोकणे हे कार चालवत होते. तर देवानंद ढोकणे हे त्यांच्या शेजारी बसले होते. संगमवाडी येथील बीआरटी बसस्टॉपसमोर कार आली असताना तेथील स्पीड ब्रेकरमुळे कारचा वेग कमी झाला. ही संधी साधत पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरानं कारमध्ये डाव्या बाजूला बसलेल्या देवानंद यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडल्या व ते पळून गेले. तीन गोळ्यांपैकी एक गोळी त्यांच्या कपाळाला चाटून गेली तर दुसरी गोळी कपाळ आणि मान यांच्यामध्ये लागली. अचानक झालेल्या या हल्ल्याने भरत गडबडून गेले. भावाला रक्ताच्या थोराळ्यात पाहून त्यांनी तीच कार तशीच इनलॅक्स अ‍ॅड बुधराणी हॉस्पिटलमध्ये नेली. तेथे देवानंद त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु झाले. रात्री शस्त्रक्रिया करुन त्यांच्या शरीरातून गोळी काढण्यात आली आहे. मात्र बराच रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे.या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळी एक पुंगळी मिळाली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार नेमका कोणत्या कारणासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हल्लेखोरांच्या तपासासाठी गुन्हे शाखेची पथके विविध ठिकाणी रवाना झाले आहेत.  

टॅग्स :FiringगोळीबारadvocateवकिलPuneपुणेCourtन्यायालय