पिंपरी पेंढार गटातील विविध विकासकामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:23+5:302021-07-14T04:14:23+5:30
ओतूर येथे श्री कपर्दिकेश्वर मंदिराजवळच्या श्रीकृष्ण रामजी तांबे (झांबरशेठ) कुस्तीच्या आखाड्यातील उर्वरित कामासाठी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात ...

पिंपरी पेंढार गटातील विविध विकासकामांचा शुभारंभ
ओतूर येथे श्री कपर्दिकेश्वर मंदिराजवळच्या श्रीकृष्ण रामजी तांबे (झांबरशेठ) कुस्तीच्या आखाड्यातील उर्वरित कामासाठी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून ओतूर-जुनी उंब्रज पांध, रस्त्यासाठी २६ लाख रुपयांचा निधी, डुंबरवाडी येथे ६७ लाख ७५ हजार रुपयांचा निधी, पिंपरी पेंढार येथील सार्वजनिक कामांसाठी ९७ लाख रु.चा निधी उपलब्ध करून देण्यात आला. ही सर्व कामे कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार अतुल बेनके यांनी ठेकेदाराला दिल्या. तसेच श्री कपर्दिकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र 'ब ' दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे व लवकरच अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये लहान मुलांसाठी शंभर खाटांचे कोविड सेंटर सुरु करण्यात येईल, असेही आश्वासन आमदार अतुल बेनके यांनी या वेळी दिले. याप्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, सागर कोल्हे, जि. प. सदस्य मोहित ढमाले , गजानन महाराज प्रशिक्षण संस्थेचे मानद सचिव वैभव तांबे, कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, बाजार समितीचे संचालक संतोष तांबे, सरपंच गीताताई पानसरे, उपसरपंच प्रेमानंद अस्वार, दयानंद डुंबरे, उद्योजक जालिंदर पानसरे, संदेश एरंडे, श्रीकांत थोरात, अभिजित वल्व्हनकर, ओतूर पोलीस स्टेशनचे पो. नि. परशुराम कांबळे, माजी सरपंच गंगाराम डुंबरे, सुदाम घोलप, जयप्रकाश डुंबरे, जी. एम. डुंबरे, जनार्दन खामकर, सुमित कांबळे, ग्रा. पं. सदस्य प्रशांत डुंबरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना आमदार अतुल बेनके.