शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हास्य योगामुळे टळू शकतो घटस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 21:06 IST

एका जोडप्याने घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना हास्य योग करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आले आहे.

ठळक मुद्देहास्य योगाचे अनेक फायदे असून शारिरिक व मानसिक आजारांवर गुणकारी उपचार

पुणे: कौटुंबिक वादामुळे न्यायालयात घटस्फोटासाठी गेलेल्या एका जोडप्याची तक्रार ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना हास्य क्लब जॉईन करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हे दोघेही सकाळी विविध प्रकारचे हास्य योगाचे प्रकार करत आहेत. त्यामुळे हास्य योगामुळे एक संसार तुटण्यापासून वाचू शकेल का? हे पाहणे पुढील काळात उत्सुकतेचे ठरणार आहे.सासू सुनेचे भांडण, एकत्रित कुंटुंब, चारित्र्यावरील संशय, आर्थिक परिस्थिती ,दारू पिऊन दररोज मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्यास सांगणे,लग्नापूर्वी खोटी माहिती देवून फसवणूक करणे , आजारपण आदी कारणांमुळे कौंटुबिक न्यायालयात घटफोटासाठी दावे दाखल केले जातात. त्यावर काही महिने समुपदेशन करून दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला जातो. मात्र, एका जोडप्याने घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना हास्य योग करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती लाफ्टर योगा इंटरनॅशनलचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी दिली आहे.कौटुंबिक कलहामुळे एका जोडप्यात वाद होत होता. मात्र,हा वाद विकोपाला गेल्यामुळे त्यांनी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यावर कौटुंबिक न्यायाधीश स्वाती चव्हाण यांच्या न्यायालयाने त्यांना हास्य योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले, असे नमूद करून टिल्लू म्हणाले, काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सध्या ते दोघे हास्य योगाचे प्रशिक्षण घेत आहेत. आयुष्य खूप सुंदर असून त्याला अधिक सुंदर करून जगले पाहिजे. हास्य योगाचे अनेक फायदे असून शारिरिक व मानसिक आजारांवर गुणकारी उपचार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. न्यायालयाकडून पाठविण्यात आलेल्या जोडप्याचा संसार तुटू नये, असाच माझा व माझ्या सहका-यांचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :PuneपुणेDivorceघटस्फोट