कुंजीर तालमीचे वस्ताद स्व. गुरुवर्य निवृत्ती मारणे यांच्या चित्रप्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:09 IST2021-06-19T04:09:02+5:302021-06-19T04:09:02+5:30

समस्त कुंजीर तालीम मित्र परिवार आणि मारणे परिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाराष्ट्र प्रदेश ...

Late Vastad of Kunjir Talmi. Unveiling of a portrait of Guruvarya Nivruti Marane | कुंजीर तालमीचे वस्ताद स्व. गुरुवर्य निवृत्ती मारणे यांच्या चित्रप्रतिमेचे अनावरण

कुंजीर तालमीचे वस्ताद स्व. गुरुवर्य निवृत्ती मारणे यांच्या चित्रप्रतिमेचे अनावरण

समस्त कुंजीर तालीम मित्र परिवार आणि मारणे परिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दत्ता खाडे, मास्तर बाळकृष्ण मारणे, नगरसेवक बाळासाहेब बोडके, विश्वास मानकर, नगरसेवक राजेश येनपुरे, हेमंत माझिरे, विरेंद्र गट, प्रशांत गांधी, वस्ताद संभाजी आंग्रे, विजय माझिरे, आप्पा शिंदे, बाबासाहेब माझिरे, आप्पासाहेब दिसले, विलास वांजळे, पांडुरंग वांजळे, श्रीरंग चव्हाण, मारुती दिघे, पै.श्रीकृष्णदादा बराटे, रामदास मारणे, शाम मारणे, सरपंच तानाजी मारणे, प्रमोद उमरदंड आदी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, गुरुवर्य निवृत्ती मारणे यांनी आयुष्यभर लाल मातीची सेवा केली. आपल्या देशाला क्रीडा क्षेत्राची मोठी परंपरा लाभली आहे. त्यातील कुस्ती हा क्रीडाप्रकार आपल्याला नम्रता, संस्कार आणि संयम शिकवतो.

श्रीकृष्ण बराटे यांनी सूत्रसंचालन केले. रामदास मारणे यांनी आभार मानले.

Web Title: Late Vastad of Kunjir Talmi. Unveiling of a portrait of Guruvarya Nivruti Marane