स्व. किसनराव बाणखेले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:14 IST2021-09-04T04:14:58+5:302021-09-04T04:14:58+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा होणार आहे. या वेळी ...

स्व. किसनराव बाणखेले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा होणार आहे. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेना नेते संजय राऊत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी लोकनेता स्मरणिका प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. लोकनेते स्वर्गीय किसनरावजी बाणखेले स्मारक समिती, समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना नियम पाळून सदर कार्यक्रम होणार असल्याची माहिती शेठ अंबालाल बापूभाई धर्मार्थ दवाखाना ट्रस्टचे अध्यक्ष रामदास बाणखेले यांनी दिली.