आळंदी येथील हभप विनायक गुरव व हभप अरुण कोठावळे हे या स्पर्धांचे परीक्षण करीत आहेत. प्रसिद्ध निवेदक महेश राऊत यांनी सूत्रसंचलन केले.
यावेळी हभप सखाराम लांडगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, महिलाध्यक्षा सुनीता कोलते, नगरसेवक विजय वढणे, नंदकुमार जगताप, प्रकाश पवार, संजयनाना जगताप, वसंतराव शिंदे, अनिल उरवणे, चंद्रशेखर जगताप, सतीश शिंदे, कानिफनाथ आमराळे, म्हस्कू दळवी, शरदचंद्र जगताप, दिलीप गिरमे, बोपगाव भजनी मंडळाचे हभप दत्तात्रय फडतरे, बाळासो फडतरे, सासवड सांस्कृतिक मंडळाचे रवींद्रपंत जगताप, राजेंद्र जगताप, नंदकुमार दिवसे, संजय काटकर, प्रवीण पवार, स्वानंद लोमटे, सोमनाथ भोंगळे, जीवन कड, चिन्मय निरगुडे यांसह आदींच्या उपस्थितीत पुरंदर-हवेलीतील अनेक भजनी मंडळांचे सदस्य उपस्थित होते.
सासवड येथील संत सोपानकाका महाराज मंदिराच्या प्रांगणात स्व. चंदूकाका जगताप यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त भजन स्पर्धेला सुरुवात झाली. उपस्थितीत आ. संजय जगताप, अॅड. त्रिगुण गोसावी व मान्यवर.