शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर खराडीतील नागरिकांची प्रतीक्षा संपली, सुरू होणार लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 12:34 IST

पुरेशी जागा मिळत नसल्याने येत होती अडचण

ठळक मुद्देखराडीत यशवंत चौकातील महानगरपालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र करण्याचा निर्णय

अमोल अवचिते 

पुणे: वडगावशेरी,  खराडी भागात शहराच्या तुलनेत रुग्ण वाढीचा वेग अधिक आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. खराडीत महापालिकेचे लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र लसीकरण केंद्राला पुरेशी जागा मिळत नसल्याने अडचण येत होती. अखेर खराडीत यशवंत चौकातील महानगरपालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या चार ते पाच दिवसात सुरू होणार आहे.

अनेक वेळा नागरिकांनी , सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींनी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती.  कोरोनाची वाढती रुग्ण संख्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. खराडीतील ज्येष्ठ नागरिक आणि आता ४५ वयोगटाच्या पुढील व्यक्तींना वडगाशेरीतील महापालिकेच्या रुग्णालयात लस घेण्यासाठी जावे लागते. त्यामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. चाचणी करण्यासाठी चकरा माराव्या लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.   ऑनलाईन नोंदणी करूनही मिळत नाही लस काही दिवसांपासून खराडीत खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे ज्येष्ठांना दिसवभर रांगेत बसून रहावे लागते. अनेकवेळा वाद होत आहे. ४५ वयोगटाच्या वरील व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करून ही लस मिळत नाही. मात्र ३० ते ३५ वयोगटातील व्यक्तींना लस लगेच मिळते. लस घेण्यासाठी चकरा माराव्या लागतात. अशी तक्रार नागरिकांनी 'लोकमत' कडे मांडली. खराडीतील रक्षकनगर येथील पालिकेच्या जलतरण तलाव येथे कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथेच स्वँब तपासणी केली जाते. मात्र दिवसाला केवळ १०० च व्यक्तींची तपासणी होत असल्याने नागरिकांना दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागत आहे.  पहाटे ५ वाजता रांगेत बसावे लागेल. पाहिल्या १०० जणांचे स्वँब घेतले जाते. त्यापुढील व्यक्तींना दुसऱ्या दिवशी बोलावले जाते. रविवारी चाचणी होत नसल्याने त्रास सहन करावा लागतो. असे नागरिकांनी लोकमतला सांगितले.   

खराडीतील यशवंत चौकातील महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. कोरोना सेंटर वर १५० चाचण्या करण्यात येत आहेत. हे चाचणी केंद्र शनिवारी किंवा रविवारी या एक दिवशी बंद असते.                                                                                    सुहास जगताप, सहआयुक्त, नगररस्ता क्षेत्रीय कार्यालय. 

 आयुक्तांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार येत्या चार ते पाच दिवसात पालिकेच्या दवाखान्यात लसीकरण केंद्र सुरू होईल. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे. ४५ वयोगटाच्या पुढील व्यक्तींना येथे लस घेता येईल. तसेच कोरोना सेंटर वर १०० वरून १७५ व्यक्तींची स्वँब तपासणी करता येणार आहे.                                                                                                           - भैय्यासाहेब जाधव, नगरसेवक .

 

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका