शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

श्री क्षेत्र वढू बुद्रुकचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात : नवल किशोर राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 19:39 IST

शंभूछत्रपतींच्या प्रेरणादायी इतिहासातून समाजातील प्रत्येक स्तरातील तरुणांनी प्रेरणा घेण्याची गरज: नवल किशोर राम

कोरेगाव भीमा : श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ हे राष्ट्रीय स्मारक असून,शंभूछत्रपतींच्या प्रेरणादायी इतिहासातून समाजातील प्रत्येक स्तरातील तरुणांनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगून शंभूराजांच्या स्मारक परिसराचा विकास आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार करून त्यास मान्यताही देण्यात आली असून येत्या काही दिवसांत वढू हे देशात आदर्श प्रेरणास्थान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.         श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३० वा बलिदानस्मरण दिन आज दि.५ एप्रिल रोजी  झाला.  सकाळी शासकीय पूजा जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. अतिरिक्त पोलीस  अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, भाऊसाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, तहसीलदार गुरू बिराजदार, गटविकास अधिकारी संदीप जठार, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पंचायत समिती सदस्या सविता पऱ्हाड, सरपंच रेखा शिवले, उपसरपंच रमाकांत शिवले, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, जिल्हा बँकेच्या संचालक निवृत्ती गवारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिवले, ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, आदी उपस्थित होते.  शंभूराजांच्या समाधीची शासकीय पूजा केल्यानंतर उपस्थितांनी शंभूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पूजा केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय पूजेस आलेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायत वढू बुद्रुक यांच्या वतीने शंभुप्रतिमा देऊन करण्यात आले.       या वेळी बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले की, वढू बुद्रुक येथे शंभूराजांची समाधी असल्याने या परिसराचे मोठे महत्त्व आहे. या परिसराचा विकास करतानाच शंभूछत्रपतींनी ज्याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेत सुराज्य निर्माण केले त्याच इतिहासातून प्रेरणा घेत आपणही समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन परिसराचा विकास करण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSwarajya Rakshak Sambhajiस्वराज्य रक्षक संभाजीNavalkishor Ramनवलकिशोर राम