भातपेरणीची कामे अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: June 9, 2014 05:14 IST2014-06-09T05:14:58+5:302014-06-09T05:14:58+5:30
मावळ तालुक्यात भातपेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी बांधव पेरणीच्या कामात व्यस्त दिसत आहे.

भातपेरणीची कामे अंतिम टप्प्यात
टाकवे बुद्रुक : मावळ तालुक्यात भातपेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी बांधव पेरणीच्या कामात व्यस्त दिसत आहे.
भात लावण्यासाठी रोपे तयार करावी लागतात. यासाठी पाऊस पडण्यापूर्वी भात खाचरात वाफे पाडून त्यावर शेणखत, पाला-पाचोळा, गवत जाळून भाजला जातो. नंतर कुळपणी करून भाताची पेरणी केली जाते.
धूळवाफेवर भातपेरणी केल्याने मॉन्सूनच्या पावसात जमीन भिजून तयार होते. मावळ खोऱ्यातील शेतकरी इंद्रायणी, कोलम, समृद्धी, बासमती, सोनम, रत्ना, रुपाली आदी वाणांना पसंती देत पेरणी करतात. इंद्रायणी, समृद्धी या बियाणांना जास्त मागणी आहे. शेतकऱ्यांनी कृषी संशोधन केंद्र व व्यापाऱ्यांकडून बियाणे विकत घेतात काहीजण मागील वर्षीही उत्पन्न झालेल्या पिकांतील भात पुन्हा बियाणांचा वापर केला.
गुढीपाडव्यानंतर नांगरणी, बांधाची डागडुजी आणि दुरुस्ती करून भातपेरणीसाठी रोपे तयार करण्याची कामे पूर्ण केली जातात. (वार्ताहर)