धर्मादाय संस्थांच्या ‘ऑडिट’चे शेवटचे पाच दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST2021-02-05T05:02:50+5:302021-02-05T05:02:50+5:30
पुणे : दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर १ एप्रिलपासून सहा महिन्यांत म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत संपलेल्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केलेले ताळेबंद ...

धर्मादाय संस्थांच्या ‘ऑडिट’चे शेवटचे पाच दिवस
पुणे : दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर १ एप्रिलपासून सहा महिन्यांत म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत संपलेल्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केलेले ताळेबंद धर्मादाय संस्थांनी सादर करायचे असतात. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक संस्थांना आपली हिशोबपत्रके वेळेत तयार करता आली नाहीत. ‘अनलॅाक’नंतरही अनेक संस्थांना आपले हिशोब सनदी लेखापालांकडून तपासून घेता आले नाहीत. त्यामुळे ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर व आता अंतिमत: ३१ जानेवारीपर्यंत हे हिशोब सादर करण्यास राज्याचे धर्मादाय आयुक्त रा. ना. जोशी यांनी मुदतवाढ दिली आहे. धर्मादाय संस्थांना आपली हिशोबपत्रके मुदतीत सादर करण्याची ही शेवटची संधी आहे.
महाराष्ट्रातील सर्व धर्मादाय संस्था व ट्रस्टना ३१ मार्च २०२० अखेरच्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण (ऑडिट) केलेले ताळेबंद (बॅलेन्स शीट) धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करून त्याच्या पोचपावतीसह ताळेबंदाच्या प्रती स्थानिक धर्मादाय आयुक्तालयात दाखल करण्यासाठी आता केवळ पाच दिवस राहिले आहेत.
पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे विश्वस्त अँड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की, प्राप्तिकर विभागाने वार्षिक अहवाल दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती. त्यानुसार संस्थांनी मुदतीत लेखापरिक्षित ताळेबंद सादर करून दंडात्मक कारवाई टाळावी.