शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशासाठी अखेरची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 03:34 IST

अकरावी प्रवेशप्रक्रिया अखेरच्या टप्प्यावर असून अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी १९ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही शेवटची फेरी राबविली जाणार आहे

पुणे : अकरावी प्रवेशप्रक्रिया अखेरच्या टप्प्यावर असून अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी १९ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही शेवटची फेरी राबविली जाणार आहे. यानंतर प्रवेशासाठी कोणतीही फेरी घेतली जाणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय पध्दतीने आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया पार पाडली जात आहे. आतापर्यंत प्रवेशाच्या ७ फेºया पार पडल्या आहेत. अकरावी प्रवेशासाठी ७५ हजार अर्ज आले होते, त्यापैकी ९५ टक्के प्रवेश पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.अद्याप प्रवेशासाठी अर्ज न भरलेले विद्यार्थी, अद्याप कुठल्याही कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, काही कारणास्तव प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी, फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, प्रवेश नाकारले गेलेले विद्यार्थी या सर्वांना प्रवेश फेरीत सहभागी होता येणार आहे.विद्यार्थ्यांना १९ ते २२ सप्टेंबर पर्यंत नवीन अर्ज करणे, अपूर्ण अर्ज अ‍ॅप्रुव्ह करणे आदी प्रक्रिया पार पाडता येतील. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्रांमध्ये जाऊन अर्ज अ‍ॅप्रुव्ह करणे आवश्यक आहे. त्यानंतर २४ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आॅनलाईन क्लिक करून प्रवेश निश्चित करता येईल.अकरावी प्रवेशाची ही अंतिम फेरी असल्यामुळे पालकांनी रिक्त जागांवरील प्रवेश निश्चित करावेत. या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांसाठी पुढची फेरी राबविली जाणार नाही. त्यानंतर अकरावीसाठी आॅफलाइन पद्धतीने प्रवेश दिला जाणार नाही. आॅफलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला बसू दिले जात नाही, असे शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी स्पष्ट केले आहे.विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत माहिती नाहीअकरावी प्रवेशाची शेवटची फेरी राबविण्यात येत आहे. मात्र अद्याप किती विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, याची आकडेवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे किती जागा रिक्त आहेत, किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, याबाबत स्पष्टता मिळू शकलेली नाही.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीEducationशिक्षण