शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 18:17 IST

गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली.

ठळक मुद्देसचिन पटवर्धन यांची शिष्टाई : जगताप यांच्या चंद्रागण बंगल्यावर एक तास चर्चा

पिंपरी : गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली. राज्यलोकलेखा समितीचे अध्यक्ष अड. सचिन पटवर्धन यांच्या शिष्टाईने पिंपळेगुरव येथील जगताप यांच्या निवासस्थांनी समेट घडवियात आला. मनोमिलनाला बारणे यांनी जगताप यांना लोटांगण घातल्याची चर्चा आहे.मावळ लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरखासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात आमदार जगताप सहभागी झाले नव्हते. उलट जगताप यांच्यासह समर्थक नगरसेवकांच्या बैठकीत बारणे यांच्या उमेदवारीला विरोध करीत मतदारसंघावर भाजपाने दावा केला होता. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सुरू असूनही अपयश मिळत होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर पटवर्धन यांनी केलेली शिष्टाई कामी आली.केलेली 

एकेकाळचे चांगले मित्र असलेल्या बारणे आणि जगताप यांच्यात २००९ पासून दुरावा निमाण झाला होता.  मात्र,  युती धर्माचे पालन करू असे जगताप यांनी पत्रकार परिषदेत काही दिवसांपूर्वी सागितले होते. मात्र, बारणे यांनी स्वतः माझ्याकडे येऊन माफी मागण्याची त्यांची अट होती.  त्यानुसार पटवर्धन यांच्या पुढाकाराने बारणे यांनी जगताप यांच्या निवासस्थानी आज भेट घेतली. एक तास चर्चा झाली, मात्र गुप्त बैठक असल्याचे सांगत माहिती देण्यास नकार देण्यात आला......---दोघापुढेही दिलजमाईशिवाय नव्हता पर्याय... लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा दोघे समोरा-समोर आले होते.  बारणे यांनी शिवसेना-भाजप तर  जगताप यांनी शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली होती. त्यात बारणे यांनी जगताप यांचा पराभव केला होता. आता बारणे शिवसेनेत तर जगताप भाजपमध्ये आहेत. दोन्ही पक्षाची लोकसभा निवडणुकीला युती झाली आहे. भाजपने मावळ लोकसभा मतदारसंघ सोडण्याची मागणी केली. परंतु, युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला. त्यामुळे दोघापुढेही दिलजमाई शिवाय पर्याय नव्हता.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळLakshman Jagtapलक्ष्मण जगतापShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस