लंकादहन, कालियामर्दन, वाल्याचा झाला वाल्मीकी
By Admin | Updated: September 5, 2014 01:10 IST2014-09-05T01:10:59+5:302014-09-05T01:10:59+5:30
भव्य आकर्षक व हलते देखावे सादर करण्याची परंपरा आकुर्डीतील सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी या वर्षीही कायम ठेवली आहे.

लंकादहन, कालियामर्दन, वाल्याचा झाला वाल्मीकी
निगडी : भव्य आकर्षक व हलते देखावे सादर करण्याची परंपरा आकुर्डीतील सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी या वर्षीही कायम ठेवली आहे. सामाजिक व जिवंत देखाव्यांबरोबरच आकर्षक रोषणाई केली आहे.
आकुर्डीतील तुळजाईवस्ती येथील श्री तुळजामाता मित्र मंडळाने लंका दहन हा हलता देखावा सादर केला आहे. देखाव्यातील 22 फुटी हनुमान मूर्ती मुख्य आकर्षण आहे. मंडळाचे हे 38 वे वर्ष आहे. चेतन काळभोर मंडळाचे अध्यक्ष असून, अतुल बिबवे उपाध्यक्ष आहेत.
तरुण मित्र मंडळ सद्भावना प्रतिष्ठानाने मनपा शाळेजवळ कालियामर्दन हा भव्य देखावा सादर केला आहे. नगरसेवक उल्हास शेट्टी मंडळाचे अध्यक्ष असून, दिनेश जगताप उपाध्यक्ष आहेत. अजय लढ्ढा कार्याध्यक्ष आहेत. मंडळाचे हे 49 वे वर्ष आहे.
विठ्ठलवाडीतील एकता मित्र मंडळाचा मयूर रथ व आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी गर्दी होत आहे. प्रमोद कुटे मंडळाचे संस्थापक आहेत. संतोष कुटे अध्यक्ष तर राहुल लोढा उपाध्यक्ष आहेत. मंडळाचे 21 वे वर्ष आहे.
आकुर्डीतील भाजी मंडईत श्री खंडेराया भाजी मंडई मित्र मंडळाने राक्षसीणीचा वध हा हलता देखावा सादर केला आहे. विजय जगताप मंडळाचे अध्यक्ष असून, चंद्रकांत काळभोर उपाध्यक्ष आहेत. सचिन नितनवरे कार्याध्यक्ष आहेत. मंडळाचे हे 21 वे वर्ष आहे. आकुर्डी गावठाणातील जय हनुमान क्रीडा व शिवराज मित्र मंडळाने ‘याला जबाबदार कोण?’ या देखाव्याच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या शिक्षेकडे लक्ष वेधले आहे. मारुती काळभोर मंडळाचे अध्यक्ष असून, राजेश काळभोर उपाध्यक्ष आहेत. मंडळाचे हे 27 वे वर्ष आहे.
नागेश्वर मित्र मंडळाने जेव्हा माणूस हरवतो हा जिवंत देखावा सादर केला आहे. नाटिकेबरोबरच विविध गीतांवर नृत्य सादर केले जात आहे. देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मंगेश कुटे मंडळाचे अध्यक्ष असून, नंदू देशमुख उपाध्यक्ष आहेत. मंडळाचे 34 वे वर्ष आहे.
नवनाथ मित्र मंडळाने नाते निसर्गाचे- प्रश्न माणसांचे हा जिवंत देखावा सादर केला आहे. अनिकेत पाडळे मंडळाचे अध्यक्ष असून, सचिन वाघ उपाध्यक्ष आहेत. मंडळाचे 43 वे वर्ष आहे.
हनुमान तरुण मंडळाने वाल्याचा झाला वाल्मिकी देखावा सादर केला आहे. मंडळाचे हे 54 वे वर्ष आहे. विजय काळभोर मंडळाचे अध्यक्ष असून, गंगाराम काळभोर कार्याध्यक्ष आहेत. हिंदवी स्वराज्य मित्र मंडळाने नशा करी संसाराची हा प्रबोधनात्मक देखावा सादर केला आहे. निखिल परमार मंडळाचे अध्यक्ष असून, संतोष सांगले उपाध्यक्ष आहेत. मंडळाचे हे 1क् वे वर्ष आहे.
सुवर्ण मित्र मंडळाने फुलांची आकर्षक सजावट केली आहे. मिलिंद पाटील मंडळाचे अध्यक्ष असून, नीलेश परदेशी उपाध्यक्ष आहेत. मंडळाचे 26 वे वर्ष आहे.
अनेक मंडळांनी देखाव्याबरोबरच महिला व मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे आकुर्डी परिसर गणोशमय झाला आहे. (वार्ताहर)
4आकुर्डीतील श्री तुळजामाता मित्र मंडळ : लंका दहन.
4तरुण मित्र मंडळ सद्भावना प्रतिष्ठान : कालियामर्दन
4विठ्ठलवाडी एकता मित्र मंडळ : मयूर रथ
4श्री खंडेराया भाजी मंडई मित्र मंडळ : राक्षसीण वध