शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली; १५ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 22:59 IST

मंकी हिलजवळ दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत

लोणावळा: मुंबई पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान लोहमार्गाच्या मिडल आणि डाऊन मार्गावर लोहमार्ग किलोमीटर क्रमांक ११७/५०० येथील एका बोगद्याजवळ पावसामुळे मोठी दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी रेल्वेसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. आज (गुरुवारी) रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली असून मार्गावर कोसळलेली दरड हटवण्यासाठी व रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. गतवर्षी खंडाळा घाटातील खंडाळा बोगदा ते मंकीहील दरम्यान एका आठवड्यात चारवेळा दरडी कोसळल्या होत्या.    

आज दिवसभर लोणावळा आणि खंडाळा घाट माथ्यावर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. खंडाळा घाटातही पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्याने खंडाळा घाटातील मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान मध्य रेल्वेच्या लोहमार्गावर मिडल आणि डाऊन मार्गावर मोठी दरड कोसळल्याने या दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूणर्पणे कोलमडली आहे. लोहमार्गावरील दरड हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती समजल्यावर रेल्वे प्रशासनाने मुंबईहून कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्सप्रेस मंकी हिलपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर थांबवली. यामुळे सह्याद्रीसह इतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहे. पुण्याकडे जाणाऱ्या राजकोट, हुबळी, चेन्नई, महालक्ष्मी, लातूर आणि मिडल मार्गाने मुंबईला जाणाऱ्या दुरांतो व चेन्नई अशा एकूण १५ रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

टॅग्स :lonavalaलोणावळाlandslidesभूस्खलन