शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांद्वारे जमीन लाटली; तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:51 IST

तलाठ्याला हाताशी धरून ६० वर्षांपूर्वी निधन झालेल्या महिलेचे वारसदार असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून गोंदी (ता. इंदापूर) येथील जमीन लाटल्याच्या आरोपावरून तीन जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

इंदापूर  - तलाठ्याला हाताशी धरून ६० वर्षांपूर्वी निधन झालेल्या महिलेचे वारसदार असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून गोंदी (ता. इंदापूर) येथील जमीन लाटल्याच्या आरोपावरून तीन जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.दत्तात्रय देशमुख, अंगद देशमुख, राहुल देवरे (सर्व रा. गोंदी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. रणजित बाळासाहेब जाधव (वय २८, रा, गोंदी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी सांगितले, की गोंदी गाव जमीन गट नं.८६ मधील सातबारा पत्रकी फिर्यादीच्या नावावर एक हेक्टर क्षेत्र आहे. प्राजक्ता रणजित जाधव, प्रताप बाळासाहेब जाधव, इंदूमती बाळासाहेब जाधव, उत्तम यशवंत जाधव यांच्या नावे उर्वरित क्षेत्र आहे. सदर जमीन गटाच्या इतर अधिकारामध्ये अंजनाबाई रामा देशमुख यांची पोकळस्त नोंद आहे. त्या ६० वर्षांपूर्वी मयत झाल्या आहेत. या जमिनीमध्ये त्यांचा पूर्वीपासून कोणत्याही प्रकारचा हक्क नव्हता. त्यांना जवळचे कोणी नातेवाईक नव्हते. दि.२७ जुलै २०१७ रोजी फिर्यादीने गोंदी येथील गाव कामगार तलाठ्याकडे या जमिनीच्या गटात कोणतीही वारस नोंद घेऊ नये, अशा आशयाचा अर्ज दिला होता. या पार्श्वभूमीवर आरोपींनी वारसांच्या नावे साखर कारखान्याचे शेअर्स करावयाचे आहेत, असे सांगून दत्तात्रय नारायण देशमुख, भागवत नारायण देशमुख, कृत्त्विक नारायण देशमुख, रघुनाथ नारायण देशमुख, विमल नारायण देशमुख, लिलावती भारत पवार, मीराबाई महादेव जाधव, कौशल्या सौदागर काटकर आदींच्या सह्या घेतल्या. त्याचा वापर करून दि. १ डिसेंबर २०१७ रोजी तहसील कार्यालयात जाऊन हे सर्वजण अंजनाबाई देशमुख याचे वारस असल्याचे बनावट प्रतिज्ञापत्रतयार केले.गोंदीचे गावकामगार तलाठी राहुल देवरे यांनी वारसदारांची कसलीही स्थानिक चौकशी न करता नारायण पांडुरंग देशमुख यांच्या आठ वारसांची नोंद केली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा