शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सरकारी सेवांसाठी जागा भाड्याने नव्हे, मालकी हक्काने देणार

By राजू हिंगे | Updated: January 21, 2025 17:54 IST

- धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू

पुणे :पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) दर्शविण्यात आलेल्या सरकारी अत्यावश्यक सेवांच्या जागा संबंधित खात्यांना भाडेतत्त्वावर देण्याऐवजी मोबदला घेऊन त्याच खात्यांना मालकी हक्काने देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. या निर्णयाची अंमबलजावणी झाल्यास शहरातील पोलिस, पोस्ट ऑफीस, महावितरणसारख्या सेवांसाठी दिलेल्या जागा या संबंधित खात्यांच्या मालकीच्या होणार आहेत.महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये पोलिस ठाणे, पोस्ट ऑफीस, महावितरणसारख्या राज्य व केंद्र सरकारशी संबंधित अत्यावश्यक सेवांसाठी जागा आरक्षित केल्या जातात. जागा मालकांकडून या जमिनी घेऊन महापालिका त्या संबंधित विभागांना भाडेतत्त्वावर देतात. आरक्षणाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी या जागांचा वापर होत नसल्याने आणि या सरकारी कार्यालयांचे शक्यतो स्थलांतरही होत नाही.त्यातच सरकारी कार्यालयांकडून भाडे वेळेत मिळेलच, याची शक्यता कमीच असते. महापालिकाही पोलिस, पोस्ट ऑफीस, महावितरणची सेवा आणि शासकीय जागा महापालिकेच्या प्रकल्पांसाठी अधीग्रहीत करत असते. याचा महापालिकेला मोबदला द्यावा लागतो. बरेचदा महापालिका आणि शासकीय संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या सेवांचे पैसे एकमेकांना देण्याऐवजी बिलांचे सेटलमेंट केले जाते. यासाठी दोन्ही बाजूने मोठी यंत्रणा कामाला लावावी लागते. त्यामुळे डीपीतील पोलिस, महावितरण, पोस्ट यांसारख्या शासकीय सेवांच्या आरक्षणाच्या जागा संबंधित विभागांना भाडेतत्त्वावर देण्याऐवजी त्यांना मालकी हक्काने द्यायच्या.याबदल्यात शासनाची जागा महापालिकेने ताब्यात घेतली असेल तर जागेच्या बदल्यात जागा असे कायमस्वरूपी सेटलमेंट करायचे किंवा या विभागांकडून घेण्यात येणाऱ्या सेवांची बिले जागेच्या किमतीनुसार सेटल केली जावीत. यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी विविध विभागांशी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाcivic issueनागरी समस्या