शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात जागा जिल्हाधिकाऱ्यांची ‘कमाई’ पालिकेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 12:19 IST

‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ या उक्तीचा प्रत्यय पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाबाबत येऊ लागला आहे.

ठळक मुद्देनदीपात्रात पालिकेचेच बेकायदा होर्डिंग्ज: आकाशचिन्ह विभागाचे क्षेत्रिय कार्यालयांकडे बोटआकाशचिन्ह विभागाचे क्षेत्रिय कार्यालयांकडे बोट

पुणे :  ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ या उक्तीचा प्रत्यय पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाबाबत येऊ लागला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात येत असलेल्या नदीपात्रातील मोकळ्या जागांवरील होर्डिंगला परवानगी घेऊन पालिका वर्षाला लाखो रुपयांचा महसूल गोळा करीत आहे. अशा प्रकारची परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतू, आकाशचिन्ह विभागाकडे अशा किती होर्डिंग्जना परवानगी देण्यात आली आहे याची एकत्रित आकडेवारीच नाही. विभागाचे अधिकारी क्षेत्रिय कार्यालयांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे. नदीपात्रासह जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील जागांवर होर्डिंग उभारायचे असल्यास त्याला परवानगी दिली जात नाही. शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे तसेच वाहतूकीला अडथळा निर्माण होत असल्याचे कारण देत अशा जागांवरील  काढून टाकण्याचे आदेश २०११ साली विभागीय आयुक्तांनी महापालिकेसह पाटबंधारे, वाहतूक विभागाला दिलेले होते. परंतू, पालिकेकडून पाटबंधारे विभागाच्या ना-हरकत दाखल्याचा आधार घेत अनेकांना परवाने दिले गेले. आकाशचिन्ह विभागाकडून वर्षभरापुर्वीपर्यंत होर्डिंगसाठी परवाने दिले जात होते. एक वर्षभरापुर्वी या परवान्यांचे विकेंद्रीकरण करुन १५ क्षेत्रिय कार्यालयांना परवाने देण्याचे अधिकार देण्यात आले. तेव्हापासून क्षेत्रिय कार्यालय स्तरावर परवाने दिले जात असल्याचे आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विभागीय आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणीच करण्यात आली नसल्याचे समोर आले असून पुण्यातील प्रमुख नद्यांच्या पात्रांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील ग्रामीण भागातील जमिनींवरही बेकायदा होर्डिंग उभे आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही कोणत्याही प्रकारची दखल घेऊन कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. वास्तविक  होर्डिंग उभारण्यापुर्वी जागा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्या नियमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतू, अशी किती ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आली याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत. वास्तविक तशी आकडेवारीच त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याची शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या जागांवर पालिकेची  ‘कमाई’ जोरात सुरु असल्याचे चित्र आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख विजय दहिभाते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका