जमिनीच्या वादातून हाणामारी

By Admin | Updated: December 23, 2016 01:13 IST2016-12-23T01:13:13+5:302016-12-23T01:13:13+5:30

स्वत:च्याच मिळकतीमध्ये येण्यास मज्जाव करून मारहाण केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल

Land clash | जमिनीच्या वादातून हाणामारी

जमिनीच्या वादातून हाणामारी

पुणे : स्वत:च्याच मिळकतीमध्ये येण्यास मज्जाव करून मारहाण केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भगवान हिराचंद सौंगार (वय ५३, रा. रास्ता पेठ), गणेश लक्ष्मण शेळके (वय ४८, रा. शुक्रवार पेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनजीत राजपाल (वय ५६, रा. खोपकर हाईट्स, क्वार्टर गेट) यांनी फिर्याद दिली आहे. राजपाल यांची बाणेर येथे जमीन आहे. या मिळकतीमध्ये भगवान यांचा मुलगा आदित्य, गणेश शेळके तसेच अन्य साथीदारांनी बेकायदा अतिक्रमण केले. त्यांना जागेमध्ये येण्यास अडवणूक करून मोठमोठ्याने आरडाओरडा करून शिवीगाळ केली. तसेच वॉचमन भानुदास तायडे, सचिन क्षीरसागर यांना मारहाण केली. जमिनीवरील वीज मीटर चोरून नेला.

Web Title: Land clash