शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पालखीमार्गाचे भूसंपादन निधीअभावी रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 15:20 IST

मोजणी, सर्व्हेचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण

ठळक मुद्देबाधित क्षेत्र व शेतकऱ्यांच्या याद्यांचा अहवाल पाठवला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

रविकिरण सासवडे -   बारामती : देहू ते पंढरपूर पालखीमार्गाचे भूसंपादन निधीअभावी रखडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडतो की काय, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सुमारे वर्षभरापूर्वी बारामती, इंदापूर तालुक्यांतील बाधित क्षेत्र मोजणीचे काम झाले होते. त्याप्रमाणे शासकीय निर्देशाप्रमाणे बाधित क्षेत्र व शेतकºयांच्या याद्या व रकमेचा अहवालदेखील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला. मात्र भूसंपदनासाठी अद्याप निधी न मिळाल्याने काम रखडले आहे. बारामती उपविभागात या पालखीमार्गाचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. यामध्ये ३४ गावांचा समावेश आहे. यामध्ये ११२.७९ हेक्टर क्षेत्र बाधित होणार असून ६ हजार ५३१ बाधित व्यक्तींना ४४३ कोटी, ७३ लाख २८ हजार ९७६ रुपयांची मागणी प्रशासनाने केंद्रसरकारकडे केली आहे. मात्र निधी नसल्याने मोजणी करूनसुद्धा काम रखडले आहे.  संत तुकाराममहाराज पालखीमार्गासाठी २०१७ पासून सर्व्हेचे काम सुरू होते. तत्पूर्वी आळंदी ते पंढरपूर हा संत ज्ञानेश्वर पालखीमार्ग तसेच, देहू ते पंढरपूर या संत तुकाराममहाराजांच्या पालखीमार्गाचे चौपदरीकरण  करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये केली होती. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच संत तुकाराममहाराज पालखी महामार्गाला एनएचजी ९६५ असा क्रमांक  देण्यात आला आहे. संत तुकाराममहाराज पालखीमार्गाचे तीन टप्पे आहेत. या महामार्गाच्या सर्व्हेनंतर बाधित क्षेत्राची मोजणीदेखील युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली. तसेच गावांगावांतील शेतकºयांच्या व बाधित ग्रामस्थांच्या तक्रारींचेदेखील निराकरण करण्यात आले होते. अद्यापदी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर व निमगाव केतकी येथील  बाधित क्षेत्राचे सर्व्हे व मोजणीचे काम वगळता दौंड तालुक्यातील पाटस, रोटी, वासुंदे, हिंगणीगाडा, खराडेवाडी, तर बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, कन्हेरी, पिंपळी, काटेवाडी; इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती, बेलवाडी, लासुर्णे, जंक्शन, भरणेवाडी, अंथुर्णे, शेळगाव, शिरसटवाडी, हगारेवाडी, गोतोंडी, गोखळी, तरंगवाडी, इंदापूर, वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, लुमेवाडी, सराटी आदी गावांमधील सर्व्हे व मोजणीचे काम संपूर्णपणे पूर्ण करण्यात आले आहे. २० जानेवारी २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात मंत्रालयस्तरावर झालेल्या बैठकीतदेखील भूमिअधिग्रहणाला गती देण्यासाठी चर्चा करण्यात  आली होती. या बैठकीला सर्व विभागांचे अधिकारीदेखील उपस्थित होते. संत तुकाराममहाराज पालखीमार्गात बारामती-इंदापूर, पाटस-वासुंदेफाटा-बारामती, इंदापूर-अकलूज-माळखांबी-बोंडाळे आदी भागाचा समावेश आहे. यानंतरही केंद्राकडून निधी न आल्याने मागील वर्षभरापासून भूसंपादनाचे काम रखडले आहे. ........

बारामती उपविभाग...टप्पा     गावे    क्षेत्र    शेतकरी    रक्कमपहिला    ९     ६३.११    २,९२७    २१३,१५,४३,३४५दुसरा    २५    ४९.६८    ३,५३४    २३०,५७,८५,६३१.......२०१८ मध्ये सर्व्हे व मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. निधी जेव्हा मिळेल त्या वेळी भूसंपादनाचे काम सुरू करण्यात येईल. - दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारhighwayमहामार्ग