बनावट नोट देऊन लंपास केले दागिणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:40+5:302021-02-05T05:11:40+5:30

शनिवार (दि. ३०) सकाळी दोघे बिना नंबरच्या दुचाकीवर येऊन संपतलाल यांच्या किराणा दुकानात आले. त्यांनी काही बिस्किट ...

Lampas ornaments with fake notes | बनावट नोट देऊन लंपास केले दागिणे

बनावट नोट देऊन लंपास केले दागिणे

शनिवार (दि. ३०) सकाळी दोघे बिना नंबरच्या दुचाकीवर येऊन संपतलाल यांच्या किराणा दुकानात आले. त्यांनी काही बिस्किट खरेदी केली. त्याचे पैसे दिले. नंतर अंदाज पाहुन त्यांनी २००० हजार रुपयांची नोट काढली आणि आमच्या आईचा मृत्यू झाल्याने आम्हाला ते दोन हजार दान करायचे असे सांगितले. त्यानंतर पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. त्यावेळी आजीनी त्यांना आतून पाणी आणायला सांगितले. नंतर त्यांनी त्या दोन हजारच्या नोटेवरुन सोने ओवाळन्यासाठी द्या अशी मागणी केली प्रथमतः त्यांनी सोने दिले नाही पण नंतर त्यांनी मंगलळसुत्र व अंगठी दिली ते नोटेवरुन ओवाळून पुडित त्यांनी स्वत देवघरात ठेवले बाहेर जाऊन बिस्किटची बॅग दुकानबाहेर अड़कुन ठेवली आणि निघुन गेले. त्यानंतर त्यांनी संपतलाल यांनी देवघरात जाऊन पहिले तर त्या पुडित दगडी होत्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता त्यांनी ओतुर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला.

Web Title: Lampas ornaments with fake notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.