महिलेकडील लाख ४० हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:06+5:302020-11-28T04:07:06+5:30
पुणे : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान! बसमध्ये प्रवाशांचा ऐवज लंपास करण्याच्या घटना वाढत आहेत. स्वारगेट ते विश्रांतवाडी ...

महिलेकडील लाख ४० हजारांचा ऐवज लंपास
पुणे : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान! बसमध्ये प्रवाशांचा ऐवज लंपास करण्याच्या घटना वाढत आहेत. स्वारगेट ते विश्रांतवाडी दरम्यान प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतील मंगळसूत्र, रोकड, एटीएम कार्ड असा १ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना
घडली.
याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला स्वारगेट ते विश्रांतवाडी दरम्यान धावणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये गर्दी होती. चोरट्याने महिलेच्या पिशवीतील मंगळसूत्र, दोन हजारांची रोकड, कागदपत्रे, डेबिट कार्ड असा १ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. पी. यादव तपास करत आहेत. दरम्यान, पीएमपी बसने प्रवास करणा-या महिलेच्या पिशवीतील ५० हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची आणखी एक घटना तीन दिवसांपूर्वी घडली. स्वारगेट स्थानकातून त्या पीएमपी बसने हडपसरकडे निघाल्या होता. बस प्रवासात चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील ५० हजारांची रोकड लांबविली.