सासवडमध्ये अडीच् लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:10 IST2020-12-25T04:10:03+5:302020-12-25T04:10:03+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोनोरी रस्त्यालगत असणाऱ्या स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी मधील शुभम विठ्ठल शितकल ...

सासवडमध्ये अडीच् लाखांचा ऐवज लंपास
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोनोरी रस्त्यालगत असणाऱ्या स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी मधील शुभम विठ्ठल शितकल यांचे घराचे सेफ्टी डोअर चे कुलूप तोडून सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये एक लाख रुपये किमतीचा अडीच तोळे वजनाचा सोन्याचा गंठन, २० हजार रुपये किमतीची अर्धा तोळे वजनाची अंगठी आणि पाच हजार रुपये किमतीचा चांदीचा बाजूबंद, कमरेचा पट्टा, पैजण, मेकला आदि वस्तूंचा समावेश आहे. तर त्याच दरम्यान दुसऱ्या घटनेत सुप्रिया निलेश खळदकर यांच्या सोनोरी रात्यावरील महालक्ष्मी अपार्टमेंट मधून एक लाख रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठन आणि २० हजार रुपये किमतीची अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. असे दोन घटनेत तब्बल साडेपाच तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे.