शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

श्वानाचा जीव घेऊनही थांबली नाही लॅम्बोर्गिनी; २ वर्षांपासून ‘सूपर कार’ पळविणाऱ्याला वेसण कधी?

By श्रीकिशन काळे | Updated: August 10, 2023 16:33 IST

या वाहनचालकाने त्याला फरपटत नेले...

पुणे :  डेक्कन परिसरामध्ये दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीने लॅम्बोर्गिनी ही सूपर कार विकत घेतली होती. तेव्हापासून तो ती अतिशय वेगाने चालवतो. त्यामुळे इतरांना धोका होऊ नये म्हणून दोन वर्षांपूर्वी देखील डेक्कन परिसर समितीने याविषयी आवाज उठवला होता. परंतु, त्यावर काही कारवाई झाली नाही. आता तर त्याने गोपाळ कृष्ण गोखले चौकात (गुडलक चौक) एका श्वानाला फरपटत नेले. हे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील रेकॉर्ड झालेले आहे. त्याचे फुटेज प्राणीप्रेमीने पोलीसांना दिले आहे. त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यावरील श्वानाला जोरात धडक देऊन तो कारचालक तसाच पुढे निघून गेला. त्यामुळे हा वाहनचालक नागरिकांसाठी देखील धोकादायक बनला आहे. त्याच्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करून गुन्हा दाखल करण्यात आला.

महागडी गाडी वेगाने चालविण्याचा पराक्रम एक वाहनचालक गेल्या वर्षभरापासून करत आहे. त्याच्याविरोधात पोलीसांमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या सदस्यांनी दोन वर्षांपूर्वी देखील याच वाहनचालकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. या सूपर कारमुळे बुधवारी एका श्वानाला आपला जीव गमवावा लागला. कारण या वाहनचालकाने त्याला फरपटत नेले. त्यातच त्याचा जीव गेला. या वाहनचालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या वाहनचालकावर भारतीय दंड संहिता १८६० कलम २७९, प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ४२९ असे आणखी दोन कलमातंर्गत डेक्कन पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातfergusson collegeफर्ग्युसन महाविद्यालय