महिला मतदार सव्वा लाखांनी वाढल्या
By Admin | Updated: August 11, 2014 03:45 IST2014-08-11T03:45:44+5:302014-08-11T03:45:44+5:30
निवडणूक आयोगाने जून महिन्यात राबविलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत तीन लाख चार हजार जणांनी नोंदणी केली

महिला मतदार सव्वा लाखांनी वाढल्या
पुणे : निवडणूक आयोगाने जून महिन्यात राबविलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेत तीन लाख चार हजार जणांनी नोंदणी केली असून, यातील महिला मतदारांचे प्रमाण एक लाख वीस हजार इतके आहे. मोहिमेत प्रथमच महिलांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी केल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात दरहजार मतदारांमागे महिला मतदारांचे प्रमाण ९०३ आहे. पुणे जिल्ह्यात हेच प्रमाण डिसेंबरमध्ये ८९५ होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील निवडणुकीत मतदान करणाऱ्या स्त्री-पुरुष मतदारांची लिंग गुणोत्तर पाहणी केली होती. यात पुणे जिल्ह्यात १ हजार मतदारांमागे महिला मतदारांचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले. पुणे जिल्ह्यातील महिला मतदानाचे प्रमाण किमान राज्याएवढे वााढविण्याची सूचना आयोगाने केली होती. निवडणूक आयोगान विशेष मतदार नाव नोंदणी मोहिम राबविली होती. या मोहिमेत तुलनेत कमी महिलांनी नाव नोंदणी केली होती. मतदार यादीतून नाव वगळलेल्याने. मतदानापासून अनेक नागरीक वंचित राहिले होते.(प्रतिनिधी)