शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तीन घरफोड्यांत ४२ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 03:14 IST

शहरातील घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेतले जात नसून, दररोज किमान तीन घरफोड्यांचे प्रकार घडताना दिसून येत आहे़ बुधवारी चोरट्यांनी विश्रांतवाडी, धायरी आणि पिंपळे निलख या परिसरात केलेल्या घरफोड्यांमध्ये तब्बल ४२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

पुणे : शहरातील घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेतले जात नसून, दररोज किमान तीन घरफोड्यांचे प्रकार घडताना दिसून येत आहे़ बुधवारी चोरट्यांनी विश्रांतवाडी, धायरी आणि पिंपळे निलख या परिसरात केलेल्या घरफोड्यांमध्ये तब्बल ४२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत़प्रशांत तांबे (वय ३८, रा़ सुभाषनगर, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत तांबे यांची पिरंगुट येथे स्वत:ची कंपनी आहे. त्यांच्या पत्नी एका आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. ते सुभाषनगर येथील प्रणयराज हेरिटेज सोसायटीत भाड्याने राहतात. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या पत्नी कामाला बाहेर पडल्या, तर तांबे हे त्यांच्या कामासाठी साडेनऊच्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता त्यांच्या पत्नी घरी परतल्या. त्या वेळी त्यांना दाराला फक्त कडी लावलेली दिसली. त्यांनी आत पाहिल्यावर कपाटातील ११ लाख ८८ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी हा प्रकार तांबे यांना फोन करून सांगितला. तांबे यांनी तत्काळ विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे पुढील तपास करीत आहेत.तेजस मार्कंडेय मिठापेल्ली (वय ३१, रा़ लिमयेनगर, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिठापेल्ली कुटुंबीयाचा रविवारपेठेत साडीविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा धायरी येथील लिमये नगरमध्ये रो-हाऊस आहे. मिठापेल्ली यांचे वडील फिरण्यासाठी ३० जानेवारीला गुजरात येथे गेले होते. त्यांची बहीण नोकरीनिमित्त बाहेर गेली होती. तेजस हे रविवार पेठेतील त्यांच्या साडीदुकानात गेले होते. दुकानातून संध्याकाळी घरी आले असता त्यांच्या रो-हाऊसच्या किचनच्या खिडकीचा गज कापून चोरट्यांनी ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याचे समोर आले.पिंपळे निलख येथील करिपाल बंगला बंद असताना चोरट्यांनी किचन-रूमच्या मागील लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतील लाकडी दरवाजा तोडून प्रवेश केला़ बेडरूममधील तीन लोखंडी कपाटातील ३५ हजार रुपये व सोन्याचे दागिने, असा २४ लाख ३४ हजार १६५ रुपयांचा ऐवज चोरुन नेला़

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे