शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

उदयोन्मुख कलाकारांचा रियाझ कमी : अशोक पत्की; पुण्यात वि. वि. द. स्मृती समारोह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 12:39 IST

तंत्रज्ञानामुळे कष्ट कमी झाले आहेत, त्यामुळे गाण्याची तळमळ कमी झाली आहे. उदयोन्मुख कलाकारांचा रियाझही कमी पडत आहे,’’ अशी खंत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देशिष्य कायमच गुरूंच्या अस्तित्वाचा भाग असतात : अशोक पत्कीमाझ्याकडून संगीताची निस्सीम सेवा घडण्यासाठी प्रयत्न करेन : सुरश्री जोशी

पुणे : ‘‘शास्त्रीय संगीताबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. मात्र, आजकाल सुगम संगीताच्या बाबतीत परिस्थिती बिघडत चालली आहे. पूर्वीप्रमाणे आता संगीताविषयी आस्था राहिलेली नाही. तंत्रज्ञानामुळे कष्ट कमी झाले आहेत, त्यामुळे गाण्याची तळमळ कमी झाली आहे. उदयोन्मुख कलाकारांचा रियाझही कमी पडत आहे,’’ अशी खंत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.गांधर्व महाविद्यालयात पं. विष्णू दिगंबर पलूसकर, पं. विनायकराव पटवर्धन आणि पं. द. वि. पलूसकर या तीन दिगग्ज गुरूंच्या नावातील आद्याक्षरांपासून सुरू करण्यात आलेल्या वि. वि. द. स्मृती समारोहामध्ये मंगळवारी पं. उल्हास कशाळकर यांना पं. विष्णू दिगंबर पलूसकर स्मृती गुरुगौरव पुरस्कार, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना पं. विनायकराव पटवर्धन संगीत जीवनगौरव पुरस्कार, हार्मोनिअमवादक सुयोग कुंडलकर यांना गोविंदराव टेंबे संगीतकार पुरस्कार, गायिका सुरश्री जोशी यांना रामकृष्णबुवा वझे पुरस्कार मठाचे मठाधिपती श्रीकांत आंनद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी तालयोगी पं. सुरेश तळवलकर, संस्थेचे अध्यक्ष रवी परांजपे, प्राचार्य प्रमोद मराठे उपस्थित होते. पत्की म्हणाले, ‘‘गुरूंनी मला केवळ शागीर्द म्हणून कधीच शिकवले नाही. शिष्य कायमच गुरूंच्या अस्तित्वाचा भाग असतात. संगीताची साधना करत असताना गायनामध्ये माधुर्य निर्माण होणे गरजेचे असते. जडणघडण होत असताना स्वत:च स्वत:चे गुरू होणे आवश्यक आहे.’’ सुरश्री जोशी म्हणाल्या, ‘‘गुरूंच्या कृपेने मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्यामुळे आजवरचा प्रवास झाला असून यापुढेही माझ्याकडून संगीताची निस्सीम सेवा घडण्यासाठी प्रयत्न करेन.’’सुयोग कुंडलकर म्हणाले, ‘‘गोविंदराव टेंबे यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे. मला कलेची कोणतीही पार्श्वभूमी नाही. तरीही आई-वडिलांनी कायम प्रोत्साहन दिले. गुरू अरविंद थत्ते यांचा मी कायम ऋणी राहीन. माझ्या बरोबरीने साथसंगत करणारे सहकलाकार, वाद्य कारागीर आणि रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यांच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावरच पुढचा प्रवास करायचा आहे.’’श्रीकांत आनंद म्हणाले, ‘‘संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी महान कार्य केले.’’ उत्तरार्धात पं. उल्हास कशाळकर यांचे गायन झाले. त्यांनी हमीर रागातून ग्वाल्हेर घराण्याच्या गायनाचे दर्शन घडवले. कसदार आवाज, सुरावटीतून त्यांनी मैफिलीत रंग भरले. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकर, हार्मोनिअमवर सुयोग कुंडलकर, तानपुºयावर साई महाशब्दे आणि सौरभ नाईक यांनी साथसंगत केली.

मला घडवण्यासाठी गुरूंनी कमालीची मेहनत घेतली. संगीताचा एकेक धडा बारकाईने गिरवून घेतला. त्यामुळे आता बंदिश, तराणा यांचे महत्त्व कळते. तारीफ करायचीच असेल, तर ती गुरूंची व्हायला हवी. त्यांच्याकडूनच मला विशुद्ध कलेचे दर्शन घडले.- पं. उल्हास कशाळकर  

टॅग्स :Puneपुणे