शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर जी.एस.टी रद्द करण्याबाबत कलाकारांचे जेटलींना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 08:13 PM2017-12-17T20:13:09+5:302017-12-17T20:13:31+5:30

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांवर जीएसटी २८% व कलाकारांच्या मानधनावर १८% जीएसटी लागू झाल्यामुळे, भारतातील सर्व शास्त्रीय कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारे पत्र अरुण जेटली यांना देण्यात आले

Appeal to Jaitley for cancellation of GST on classical music programs | शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर जी.एस.टी रद्द करण्याबाबत कलाकारांचे जेटलींना निवेदन

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर जी.एस.टी रद्द करण्याबाबत कलाकारांचे जेटलींना निवेदन

googlenewsNext

पुणे: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांवर जीएसटी २८% व कलाकारांच्या मानधनावर १८% जीएसटी लागू झाल्यामुळे, भारतातील सर्व शास्त्रीय कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारे पत्र अरुण जेटली यांना देण्यात आले. ’सा’ व ’नी’ संस्थेचे सुरेंद्र मोहिते यांनी पुढाकार घेऊन हे पत्र तयार केले. त्यावर पं. जसराज,पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद जाकीर हुसेन, डॉ. एन. राजम, डॉ. प्रभा अत्रे, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पं.उल्हास कशाळकर, पं. राजन व पं. साजन मिश्रा व पं. विजय घाटे यांनी सह्या केलेले हे पत्र, श्री सुरेंद्र मोहिते व त्यांच्या सोबत पं. तळवलकर, पं. कशाळकर यांनी जेटली यांना दिले.

श्रोत्यांना शास्त्रीय संगीताच्या तिकिटावर २८% कर भरावा लागतो. हा कर खुप जास्त असुन,मध्यमवर्गीयांना या पुढे कार्यक्रमांना जाणे अवघड होणार आहे. कलाकारांच्या मानधनावर १८% जी.एस.टी. लागल्याने, संयोजकांना कलाकारांचे मानधन परवडत नाही. यामुळे छोट्या शहरांमध्ये सध्या कार्यक्रमच होत नाहीत, असे या पत्रात अर्थमंत्र्यांच्या निदर्शनात आणुन दिले आहे. हजारो वर्षांपासुन जतन केलेले हे "शास्त्रीय संगीत" कार्यक्रम न झाल्याने काही दिवसात नामशेष होईल,याची जाणिव ही करुन दिली आहे.

ह्या पत्राची दखल न घेतल्यास, सर्व कलाकार पुढच्या महिण्यात पंतप्रधान मोदी यांना भेटायला घेऊन जाणार, असेही सुरेंद्र मोहिते यांनी सांगितले.
 

Web Title: Appeal to Jaitley for cancellation of GST on classical music programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.