शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात फास्टॅगमधील ‘चीप’चा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 23:30 IST

सर्व राष्ट्रीय महामार्गांवर दि. १ डिसेंबरापासून फास्टॅग बंधनकारक

ठळक मुद्देअधिकृत विक्रेत्यांना एक महिना होऊनही फास्टॅग होऊ शकले नाहीत उपलब्ध

- राजानंद मोरे- पुणे : ‘फास्टॅग’मध्ये बसविण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक ‘चीप’ परदेशातून आयात केली जात असून सध्या या चीपची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे देशभरात फास्टॅगचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (एनएचएआय) कडून होत असलेल्या फास्टॅग वितरणातही अडचणी असल्याने काही अधिकृत विक्रेत्यांना एक महिना होऊनही फास्टॅग उपलब्ध होऊ शकले नाहीत.देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगर्ती मार्ग तसेच राज्यातील काही महामार्गांवर फास्टॅगद्वारे टोलचे पैसे घेतले जात आहेत. सर्व राष्ट्रीय महामार्गांवर दि. १ डिसेंबरापासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला होता. पण त्याच्या उपलब्धदेअभावी ही मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला. पुन्हा हीच समस्या उदभवल्याने पुढील ३० दिवसांसाठी मुदत वाढवावी लागली. केंद्र सरकारकडून फास्टॅग उपलब्ध होत नसल्याने मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये वितरणातील त्रुटींसह फास्टॅगचे उत्पादनही कमी प्रमाणात होत आहे. मागील काही दिवसांत फास्टॅगची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने तुटवडा भासत आहे. देशात फास्टॅग तयार करणाºया काही मोजक्याच कंपन्या आहेत. त्यापैकी एक असलेली एम टेक इनोव्हेशन ही कंपनी हिंजवडी येथे आहे.या कंपनीतील अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘फास्टॅगमधील चीप आपल्या हाताच्या नखाच्या केवळ १० टक्के एवढ्या आकाराची असते. ही चीप परदेशातील केवळ दोन कंपन्यांकडून तयार केली जाते. ही ‘चीप’ रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅग मध्ये बसविली जाते. या टॅगलाच फास्टॅग म्हणतात. ‘चीप’मध्ये वाहनाशी संबंधित सर्व माहिती तसेच बँकेची माहिती, टोल भरल्याची माहिती साठवून ठेवली जाते. त्यामुळे ही चीप महत्वाची असते. पण सध्या परदेशातून या चीपची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे टॅगच्या उत्पादनावर परिणाम होत असून ग्राहकांची मागणी पुर्ण होत नाही. मागील काही दिवसांत ही मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. नोव्हेंबरपर्यंत दररोज सुमारे २० ते ३० हजार फास्टॅगचे उत्पादन होत होते. कंपनीकडून भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनीसह काही बँका तसेच मागणीनुसार फास्टॅग उपलब्ध करून दिले जातात.  पण या कंपनीने जानेवारी महिन्यातच चीप उपलब्ध होतील असे सांगितले आहे. त्यामुळे फास्टॅगचे उत्पादन ठप्प झाले आहे.’ -----------स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अधिकृत फास्टॅग विक्रेत्यांनीही फास्टॅग उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. ‘फास्टॅग सुरू होण्याची मुदत ६० दिवसांची असते. मागील महिन्यापर्यंत मागणी अभावी ही मुदत संपण्याआधी ‘एनएचएआय’ला टॅग परत करावे लागत होते. पण आता २० दिवसांपुर्वी आॅर्डर देऊनही फास्टॅग मिळत नाहीत. सध्या जवळपास १५० जणांनी टॅगची मागणी केली आहे. पण टॅग कधी मिळणार हे सांगु शकत नाही.’ प्रकाश रोडके हेही मागील दीड वर्षांपासून फास्टॅगची विक्री करतात. पण त्यांनी मागील १६ दिवसांपुर्वी नोंदणी करूनही केंद्राकडून फास्टॅग मिळालेले नाहीत. धनकवडी येथील दत्ता निगडे यांनाही हाच अनुभव येत आहे. त्यांनी एक महिन्यापुर्वी ‘एनएचएआय’कडे टॅगची आॅर्डर दिली असून अद्याप मिळालेले नाहीत.पुण्यातील बँक आॅफ बडोदामधील एका अधिकाºयाने सांगितले की, हिंजवडी येथील कंपनीकडे सुमारे २ लाख फास्टॅगची मागणी केली आहे. पण आतापर्यंत केवळ ५० ते ६० हजार टॅग मिळाले आहेत. परदेशातील मिळणारी चीप उपलब्ध होत नसल्याने फास्टॅगची निर्मिती ठप्प झाल्याचे कारण दिले जात आहे. 

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गtollplazaटोलनाका