शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

विद्युतदाहिनीतील अंत्यसंस्काराला खो, पालिकेचा अजब न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 7:17 AM

नागरिकांनी विद्युत/गॅस दाहिनीऐवजी पारंपरिक पद्धतीने लाकडे जाळून अंत्यसंस्कार केल्यास साडेतीन हजार रुपये अनुदान देण्याची अजब योजना मांडली आहे.

दीपक जाधर्वपुणे : नागरिकांनी विद्युत/गॅस दाहिनीऐवजी पारंपरिक पद्धतीने लाकडे जाळून अंत्यसंस्कार केल्यास साडेतीन हजार रुपये अनुदान देण्याची अजब योजना मांडली आहे. यामध्ये अंत्यसंस्कार करण्याच्या पद्धतीमध्ये भेदभाव करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या योजनेमुळे पुन्हा लाकडे जाळून अंत्यसंस्कार करण्यास अधिक प्रोत्साहन मिळून पर्यावरणपूरक विद्युतदाहिनीचा वापर कमी होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.शहरातील सर्वधर्मीयांच्या अंत्यसंस्कारांसाठी पालिकेकडून अनुदान दिले जाणार आहे. मात्र हिंदू पद्धतीनुसार विद्युत/गॅस दाहिनीत होणारे अंत्यसंस्कार व पारंपरिक पद्धतीने होणारे अंत्यसंस्कार असा भेद करण्यात आला आहे. पारंपरिक लाकडे व गौºया जाळून अंत्यसंस्कार केल्यास साडेतीन हजार रुपये अनुदान पालिकेकडून दिले जाणार आहे. विद्युत/गॅसदाहिनीत अंत्यसंस्कार केल्यास मात्र पालिकेकडून अनुदान दिले जाणार नाही, असा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे.शहरामध्ये वर्षाला ३० हजार मृत्यू होतात, त्यापैकी २० हजार मृत्यू हे स्थानिक असतात तर साधारणत: १० हजार मृत्यू हे बाहेरगावचे असतात. सध्या स्थानिक १५ हजार मृतांपैकी १० हजार पार्थिवांवर विद्युत/गॅस दाहिनीत अंत्यसंस्कार केले जातात. उर्वरित ५ ते ६ पार्थिवांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात़ सुमारे ५ हजारांवर दफनविधी केला जातो़ म्हणजे एकूण अंत्यसंस्काराच्या ७५ टक्के अंत्यसंस्कार हे सध्या विद्युत/गॅस दाहिनीत होतात. मात्र विद्युत/गॅस दाहिनीऐवजी पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केल्यासच अनुदान देण्याची अट पालिकेने घातली आहे. यामुळे विद्युत/गॅसदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.महापालिका निवडणुकीपूर्वी शहरात होणाºया सर्व अंत्यसंस्काराचा खर्च महापालिकेने करावा, यासाठी राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानुसार मुख्य सभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला, त्याचबरोबर अंदाजपत्रकामध्ये यासाठी २ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर आता या योजनेच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव नुकताच प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला आहे.सर्व अंत्यसंस्कारांचा खर्च पालिकेकडून करण्यात यावा, अशी मागणी राजकीय पक्षांकडून केली होती. मात्र विद्युत/गॅसदाहिनीतील अंत्यसंस्कारांसाठी पालिकेकडून कुठलेही शुल्क घेतले जात नसल्याने त्यासाठी अनुदान देण्याची तरतूद केली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र याचा मोठा परिणाम विद्युत/गॅसदाहिनीतील अंत्यसंस्कारांवर होणार असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.