तुकईवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कुसुम भांबुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST2021-03-01T04:12:58+5:302021-03-01T04:12:58+5:30

दरम्यान, सरपंचपदासाठी कुसुम संदीप भांबुरे, तर उपसरपंचपदासाठी साहेबराव गाढवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब ...

Kusum Bhambure as Sarpanch of Tukaiwadi Gram Panchayat | तुकईवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कुसुम भांबुरे

तुकईवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कुसुम भांबुरे

दरम्यान, सरपंचपदासाठी कुसुम संदीप भांबुरे, तर उपसरपंचपदासाठी साहेबराव गाढवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गायकवाड व सहायक निवडणूक अधिकारी तथा ग्रामसेविका ठुबे यांनी दोघांची बिनविरोध निवड घोषित केली.

निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा माजी सरपंच विष्णू दरेकर, साहेबराव थिगळे, पोलीस पाटील सचिन वाळुंज, उद्योजक संतोष सांडभोर, सुभाष गाढवे, कुंडलिक थिगळे, करण सांडभोर, महेंद्र थिगळे, ग्रामपंचायत सदस्य संपत थिगळे, सुवर्णा दरेकर, रेश्मा संतोष कोरडे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कैलास थिगळे, संदीप भांबुरे, राजेंद्र भांबुरे, महेंद्र गाढवे, राजाराम दरेकर, अशोक थिगळे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदाच्या माध्यमातून गावचा विकास साधणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच कुसुम भांबुरे व उपसरपंच साहेबराव गाढवे यांनी सांगितले.

तुकईवाडी (ता. खेड) येथे नवनिर्वाचित सरपंच कुसुम भांबुरे यांना त्यांच्या पतीने उचलून घेऊन जल्लोष केला. ( छाया : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Kusum Bhambure as Sarpanch of Tukaiwadi Gram Panchayat