कुरकुंभला ग्रामस्वच्छता फेरी
By Admin | Updated: November 16, 2016 02:49 IST2016-11-16T02:49:36+5:302016-11-16T02:49:36+5:30
कुरकुंभ (ता. दौंड) येथील फिरंगाई माता विद्यालया तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून स्वच्छ भारताचा नारा देत समाजातील

कुरकुंभला ग्रामस्वच्छता फेरी
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील फिरंगाई माता विद्यालया तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून स्वच्छ भारताचा नारा देत समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून गावाचा विकास आराखडा राबविण्याचा उपक्रम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वच स्तरांवर राबविण्यात येत असताना शालेय विद्यार्थ्यांतदेखील याबाबत जागरूकता निर्माण करून सर्व गावांतील नागरिकापर्यंत त्याची माहिती पोहोचवण्याचे काम केले जात आहे.
स्वच्छतेच्या या उपक्रमात जवळपास सर्वच गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्वच्छता करण्याचा उपक्रम यशस्वी होताना दिसतो. मात्र, हा उपक्रम अशाच प्रकारे चालू राहून त्याची अंमलबजावणी कायम होत राहावी व त्यातूनच ग्रामविकास साधता यावा. यामुळे याची जागरूकता सर्वच स्तरांत निर्माण करण्याचा प्रयास केला जात आहे.
या प्रसंगी कुरकुंभचे उपसरपंच रशीदभाई मुलाणी, प्राध्यापिका अलका ढेरे, प्राचार्य नानासाहेब भापकर, संदीप भागवत व अन्य शिक्षक उपस्थित होते.
कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनदेखील ग्रामस्वच्छता अभियानाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सर्वच स्तरांवर जागरूकता निर्माण केली आहे. या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकामसुद्धा करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामस्वच्छता ही मानसिकता ठेवूनच गावाचा विकास साधण्याचा प्रयास करीत असल्याची प्रतिक्रिया या वेळी उपसरपंच रशीद मुलाणी यांनी व्यक्त केली. (वाार्ताहर)