शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत रसायनांचा साठा रस्त्यावरच!; प्रदूषण मंडळाचे अधिकारी गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 13:58 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रकल्पातील घडामोडी काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. ‘मेल्झर केमिकल्स’ या कंपनीतील अतिरिक्त रसायनांचा व रासायनिक उत्पादनाचा साठा त्यांनी चक्क रस्त्यावरच केला आहे.

ठळक मुद्देप्रदूषण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत शिंदे यांनी या परिसराची पाहणी केली असता आढळला प्रकार चित्रीकरण करताना अचानक सर्व यंत्रणा हे रसायन आत उचलून ठेवण्याचे काम झाले सुरू

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रकल्पातील घडामोडी काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. काही दिवसांपूर्वी ‘मेल्झर केमिकल्स’ या कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सांडपाणी उघड्यावर सोडल्याप्रकरणी वीज, पाणी बंद केले होते. मात्र, कंपनी प्रशासनाने अगदी दोनच दिवसांत ते पुन्हा चालू केले. विशेष म्हणजे या कंपनीतील अतिरिक्त रसायनांचा व रासायनिक उत्पादनाचा साठा त्यांनी चक्क रस्त्यावरच केला आहे.सोमवार (दि. २२) रोजी प्रदूषण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत शिंदे यांनी या परिसराची पाहणी केली असता त्यांना हा प्रकार आढळून आला. मात्र तरीदेखील यावर काहीही प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले आहे. इतकेच नव्हे तर ज्या मेल्झर केमिकल्सला त्यांनी वीज, पाणी पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली त्याच कंपनीच्या आतून रासायनिक सांडपाण्याचा प्रवाह वाहत असल्याचे देखील आढळून आले आहे. मात्र, याबाबतदेखील त्यांनी बोलायचे टाळले. फक्त या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना सदर पाणी बंद करा, असा तोंडी आदेश देऊन निघून गेले. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात रासायनिक सांडपाणी, अवैध रासायनिक साठा, अवैध रासायनिक उत्पादने निर्माण करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. मात्र याकडे जबाबदार अधिकारी मुद्दाम कानाडोळा करीत असल्याचे समोर येत आहे. रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडले जातेय, हे स्वत:च्या डोळ्याने बघूनदेखील त्यावर काहीच कारवाही केली जात नाही. गेल्या महिन्यात कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या पाच कंपन्यांचे वीज कनेक्शन व पाणीपुरवठा बंद केला होता. यामध्ये या पाचही कंपन्यांचे पाणी व वीज बंद करण्याचे आदेश होते. जनमताच्या रेट्याने महावितरण अधिकाऱ्यांनी कारवाही केली खरी, मात्र अगदी एका दिवसाच्या आत मेल्झर केमिकल्सचे वीज व पाणी पुन्हा चालू झाले. फक्त पाच लाख रुपयांच्या जामिनावर त्यांना कंपनी पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सांडपाणी उघड्यावर सोडले जाणार नाही या अटीवर. तरीदेखील या सांडपाणी परत सोडले जात आहे.मेलझर केमिकल्स या कंपनीचा रस्त्यावरच रसायनांचा साठा ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  दरम्यान या सर्व प्रकारात येथील अधिकारी वर्गाशी संपर्क केला असता त्यांनी कंपनीच्या खालील पाणी हे वर्षापूर्वी केलेल्या बांधकामावर मारलेले पाणी असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले. रस्त्यावरील रसायनाच्या साठ्याचे चित्रीकरण करताना अचानक सर्व यंत्रणा हे रसायन आत उचलून ठेवण्याचे काम सुरू झाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.

टॅग्स :KurkumbhकुरकुंभPuneपुणे