कृष्ण प्रकाश यांच्या यशाने पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:21 IST2021-02-05T05:21:13+5:302021-02-05T05:21:13+5:30
धनकवडी : ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस’ ही स्पर्धा अशाच तरुणांसाठी आपली क्षमता सिद्ध करण्याचे मोठे व्यासपीठ आहे. महाराष्ट्र पोलीस दलात ...

कृष्ण प्रकाश यांच्या यशाने पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा
धनकवडी : ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस’ ही स्पर्धा अशाच तरुणांसाठी आपली क्षमता सिद्ध करण्याचे मोठे व्यासपीठ आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ही स्पर्धा प्रथमच जिंकून केवळ महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे मत वंदेमातरम संघटना व कौशल्य विकास प्रतिष्ठानेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
‘आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस’ ही जगातील अतिशय अवघड स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेत स्पर्धकाच्या केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक क्षमतेचाही कस लागतो. ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस’ कृष्ण प्रकाश यांनी निर्धारित वेळेत पूर्ण केल्याने त्यांची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे.
कृष्ण प्रकाश यांच्या या विश्वविक्रमी कामगिरीची दखल घेऊन वंदेमातरम संघटना व कौशल्य विकास प्रतिष्ठानने त्यांना तुलसीचे रोप, तिरंगी पट्टी व सन्मान पत्र देऊन सन्मानित केले. यावेळी प्रशांत नरवडे, डॉ. रोहित सपकाळ, शिवराय ग्रुपचे अध्यक्ष मंगेश जाधव व महादेव गोलांडे उपस्थित होते.
फोटो :