वाघीरे महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:19+5:302021-01-08T04:30:19+5:30
या वेळी विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली होती. तसेच सासवडमधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय ...

वाघीरे महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात
या वेळी विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली होती. तसेच सासवडमधील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी सासवड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा ॲड. कला फडतरे, सासवड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऊर्मिला चिकणे, डॉक्टर यशस्वी झेंडे, सासवड राज्य परिवहन मंडळाच्या आगारप्रमुख मनीषा इनामके, प्राचार्या डॉ. सुषमा भोसले आदी उपस्थित होते. महाविद्यालयांमधील प्रयोगशाळा परिचारिका सुरेखा रासकर, महिला सफाई कर्मचारी आदलिंग, वैशाली चव्हाण यांचाही कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. कला फडतरे यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडून दाखवला. प्राचार्या डॉ. सुषमा भोसले म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. सूत्रसंचालन डॉ. किशोर लिपारे यांनी केले. डॉ. विद्या पाटणकर यांनी आभार मानले.
०४ सासवड