पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत सुरू झाली आहे. वाघोली मध्ये रात्रीच्या दरम्यान अज्ञात पाच तरुणांनी दहशत माजवत कोयत्याच्या साह्याने दुकानासमोर लावलेल्या लाईटची तोडफोड केली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
या घटनेचे फुटेज समोर आले आहेत. काही गाड्यांवर देखील त्यांनी कोयता मारण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांच्या घरासमोरील पार्क केलेल्या गाडीवर देखील कोयता मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एकीकडे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कोयता गँगची दहशत मोडून काढा असे आदेश देतात तर दुसरीकडे पुणे पोलीस आयुक्त कोयता गँगवर कडक कारवाई करणार असे सांगत असली तरी कोयता गँग यांची दहशत काही थांबत नाही. पुणे शहरातील कोयता गँगचे लोन आता वाघोली पर्यंत पोहोचल्याने वाघोली मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसापासून पुणे शहरात ‘कोयता गँग’ची दहशत थांबायचं नाव घेतच नाही. कुठे रस्त्यावर उभी वाहनं फोडली जात आहेत. तर कुठे लूटमार केली जात आहे. २६ नोव्हेंबर रोजी विमाननगरमध्ये कोयता गँगच्या पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं एका पान टपरीवाल्यावर हल्ला करत धुमाकूळ घातला होता. या टोळक्याला सुरुवातीला सिगारेट दे, विमल दे असं म्हणत दुकानात असणाऱ्या व्यक्तीला धमकावलं. या गुंडांचा उन्नत पाहून दुकानदार त्यांना पाहिजे त्या वस्तू देतही होता.
सिगारेट, विमल आणि पाहिजे ते घेतल्यानंतरही या गुंडांचं समाधान झालं नाही. त्यानंतर टोळक्यातील एकाने शर्टात लपवलेला कोयता बाहेर काढला. आणि क्षणात दुकान फोडायला सुरुवात केली. दिसेल त्या वस्तूंवर शटर, काउंटर, दुकानातील वस्तू यावर त्याने कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. या टोळक्याचा हा उन्माद पाहून परिसरात उपस्थित नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. आणि त्यानंतर हे गावगुंड पळून गेले. संबंधित दुकानदार यातून सावरत असतानाच हातात कोयता घेतलेला तो गुंड पुन्हा आला. पुन्हा कोयत्याचा धाक दाखवला. आणि पुन्हा त्याला पाहिजे त्या वस्तू घेऊन निघून गेला, कोयता गँगची दहशत पुण्यात अजूनही थांबत नाही.
Web Summary : Pune faces renewed Koyta Gang terror. In Wagholi, five youths vandalized shops with sickles, captured on CCTV. Despite police assurances, the gang's reach extends, creating fear among residents as incidents of violence and vandalism increase.
Web Summary : पुणे में फिर कोयता गिरोह का आतंक। वाघोली में पांच युवकों ने दुकानों में तोड़फोड़ की, सीसीटीवी में कैद। पुलिस के आश्वासन के बावजूद, गिरोह का दायरा बढ़ रहा है, जिससे निवासियों में डर है क्योंकि हिंसा की घटनाएं बढ़ रही हैं।