शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचा दणदणीत विजय, मताधिक्क्याची 'लाखा'कडे वाटचाल...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:15 IST

kothrud Vidhan Sabha Election Result 2024 Live : चंद्रकांत पाटील यांनी ९० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत पक्षाचा दबदबा कायम ठेवला

kothrud  Vidhan Sabha Election Result 2024 Live :  पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी ९० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत पक्षाचा दबदबा कायम ठेवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांच्यासोबत लढत होत असतानाही पाटील यांनी मतदारसंघात ९०,७६९ मतांचे प्रचंड मताधिक्य घेत भाजपच्या बालेकिल्ल्यास साजेसा विजय मिळवला आहे.

आकडेवारी (१६व्या फेरीनंतर):

चंद्रकांत पाटील (भाजप): १,२९,३७२ मते

चंद्रकांत मोकाटे (शिवसेना - उद्धव गट): ३८,६०३ मते

ॲड. किशोर शिंदे (मनसे): १५,३२२ मते

चंद्रकांत पाटील यांचे लीड: ९०,७६९ 

पुण्यात भाजपचा सहाही मतदारसंघात विजय

पुण्यातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपच्या वाट्यास आले होते. या सर्व ६ जागांवर भाजपने दमदार विजय मिळवला आहे. कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, कसबा पेठेत हेमंत रासने, पर्वतीत माधुरी मिसाळ, खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघात सुनील कांबळे आणि शिवाजीनगर येथे सिद्धार्थ शिरोळे यांनी विजय मिळवत पुण्यात भाजपचे वर्चस्व कायम ठेवले आहे.

शिवसेना (उद्धव गट) आणि मनसेची निराशा

कोथरूडमध्ये शिवसेना (उद्धव गट) आणि मनसेने उमेदवार दिले होते मात्र प्रमुख नेत्यांनीच प्रचाराकडे कानाडोळा केल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही.

भाजपसाठी महत्त्वाचा विजय

पुण्यातील महायुतीच्या यशामुळे भाजपसाठी हा विजय केवळ स्थानिक नाही, तर राज्य पातळीवरही महत्त्वाचा मानला जात आहे. कोथरूडसह पुण्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मिळवलेले यश भाजप पक्ष संघटनेची ताकद अधोरेखित करत आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील