कोथरूड पोलिसांकडून इराणी टोळीला अटक

By Admin | Updated: June 9, 2014 05:09 IST2014-06-09T05:09:24+5:302014-06-09T05:09:24+5:30

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या इराणी टोळीच्या ५ सदस्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे

Kothrud police arrests Irani gang | कोथरूड पोलिसांकडून इराणी टोळीला अटक

कोथरूड पोलिसांकडून इराणी टोळीला अटक

पुणे : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या इराणी टोळीच्या ५ सदस्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी एकाला अटक करण्यात आली होती.
हैदरअली अब्बासअली सिया ऊर्फ इराणी (वय २५, रा. हडपसर), खमरअली फिरोजअली शेख ऊर्फ इराणी (वय २०), मोहम्मद फिरोज खान ऊर्फ इराणी (वय १९, रा. पाटील इस्टेट), फिरोज खानू खान (वय ४२, रा. लोणावळा), रोशनअली जावेदअली शेख ऊर्फ इराणी (वय २०, रा. बीड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शुभांगी गर्दे (वय ८१, रा. पौड रस्ता, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.
गर्दे या २ फेब्रुवारी रोजी आयडियल कॉलनीमध्ये किराणा माल आणण्यासाठी गेल्या असता, आरोपींनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले होते. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले होते. आरोपींना १० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Web Title: Kothrud police arrests Irani gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.